America Dark Side: अमेरिकेच्या झगमगाटामागील गरीबी दाखवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अमेरिकेतील बेघर लोक, झोपडपट्ट्या आणि दारिद्र्याचं वास्तव दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडिओ पाहून लोक अवाक् झाले आहेत. कारण अमेरिका म्हणताच आपल्या डोळ्यांसमोर श्रीमंतीचं चित्र उभं राहतं.

काय दाखवलंय व्हिडिओमध्ये?
हा व्हिडिओ arbaazvlogs या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तरुणाने अमेरिकेतील गरीब वस्तीचं चित्रण केलं आहे. या ठिकाणी बेघर लोक राहत असल्याचं तो सांगतो. ही माणसं इतकी गरीब आहेत की, त्यांच्याकडे ना धड घरं आहेत, ना खायला पुरेसं अन्न. फुटपाथवर झोपड्या बांधून ते राहतात आणि कचरापेटीत अन्न शोधतात. या भागात अस्वच्छताही मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय, पोलिसांची पुरेशी सुरक्षा नसल्यामुळे या भागात सामान्य लोकांना फिरायलाही भीती वाटते. कारण कधी कोण सामान हिसकावून नेईल, हे सांगता येत नाही. या व्हिडिओमधील आणखी एक लक्षवेधी बाब म्हणजे या परिसराच्या समोरच काही आलिशान इमारती दिसतात. म्हणजे हा प्रकार अगदी आपल्या मुंबईसारखाच आहे. रस्त्याच्या एका बाजूला डोळे दिपवणारी श्रीमंती, तर दुसऱ्या बाजूला पाहवत नाही अशी गरीबी दिसते.
अमेरिकेतसुद्धा आहे गरीबी
हा व्हिडिओ २ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच, अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आश्चर्य व्यक्त केलं आहे. कारण अमेरिकेतही झोपडपट्ट्या आहेत, हे पाहून अनेकांना धक्का बसला आहे. असो, हा व्हिडिओ पाहून तुम्हाला कसं वाटलं? तुम्हीही तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या.
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

