Headlines

India vs Sri Lanka 2 Match Test Series BCCI Announced 15 Players Squad Ravindra Jadeja Saransh Jain Shubhman Gill; जड्डूचं पुनरागमन, 33 वर्षीय सारांशला पहिल्यांदा संधी; श्रीलंका कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा


Team India Squad vs Sri Lanka Test Series : बीसीसीआयने आज श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.

Team India Squad vs Sri Lanka Test Series
भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी सामना संघ जाहीर(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आज मंगळवारी श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची दणक्यात घोषणा केली आहे. शुभमन गिलकडे संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं असून केएल राहुलची उपकर्णधारपदी वर्णी करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे तब्बल आठ महिन्यांनंतर अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचं कसोटी संघात दिमाखात पुनरागमन झालं आहे. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा अंतिम सहभाग त्याच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे.

262 दिवसांनंतर पुनरागमन

श्रीलंका मालिकेसाठी संघ निवडण्यापूर्वी रवींद्र जडेजाला संधी मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. जडेजानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर त्याला वनडे संघातूनही वगळण्यात आलं होतं. मात्र, आता तो पुन्हा एकदा भारतीय संघात परतला आहे. भारताचा श्रीलंकेविरुद्ध पहिला कसोटी सामना 15 ऑगस्ट रोजी होणार असून त्या दिवशी जडेजा तब्बल 262 दिवसांनंतर कसोटी सामन्यात पुनरागमन करणार आहे.

अंतिम एन्ट्री त्यांच्या फिटनेसवर अवलंबून

बीसीसीआयनं जसप्रीत बुमराह आणि साई सुदर्शन यांचा संघात समावेश केला असला, तरी दोघांची अंतिम एन्ट्री त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असेल. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यानंतर बुमराहच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मालिकेतील निर्णायक सामना गमवावा लागला होता. बुमराह आणि सुदर्शन यांना सेंटर ऑफ एक्सलन्सकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच त्यांना खेळण्याची परवानगी मिळेल. तसेच अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर निवडीसाठी उपलब्ध नसल्याची माहितीही बीसीसीआयनं दिली.
Maharashtra TimesTeam India : भारताला झिम्बाब्वेविरूद्धच्या मालिकेत 3 प्रश्नांची उत्तरे मिळाली, कोच लक्ष्मणच्या एण्ट्रीनंतर विजयाचा श्रीगणेशा, जाणून घ्या

सारांशचा पहिल्यांदाच कसोटी संघात प्रवेश

सारांश जैनचा पहिल्यांदाच कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. 33 वर्षीय सारांश हा डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज आहे. सारांश जैन देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करतो. सारांश जैनने 54 प्रथम श्रेणी सामन्यांत 188 विकेट्स घेतल्या आहेत आणि 2223 धावा केल्या आहेत.
Maharashtra TimesVaibhav Sooryavanshi : बेबी बॉस वैभव सूर्यवंशीचा तब्बल 102 मीटरचा जायंट षटकार, कॅप्टन सिकंदर पाहतच राहिला; Video व्हायरल

भारतीय संघ

शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा , कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन.