IND w vs BAN w big drama india dropped four catches in powerplay ; मॅच तर जिंकली पण फिल्डिंगमध्ये टीम इंडिया अक्षरशः ढेपाळली, 10 बॉलमध्ये 4 कॅच कोणाकडून ड्रॉप? हरमनप्रीत काय म्हणाली?
IND w vs BAN w big drama india dropped four catches in powerplay ; मॅच तर जिंकली पण फिल्डिंगमध्ये टीम इंडिया अक्षरशः ढेपाळली, 10 बॉलमध्ये 4 कॅच कोणाकडून ड्रॉप? हरमनप्रीत काय म्हणाली?
T-20 WC 2026, India Women Catch Drops : महिला टी-२० विश्वचषक २०२६ बांगलादेशविरुद्धच्या सामन्यामध्ये भारताने पॉवरप्लेमध्ये चार कॅच सोडले. तेही पावरप्लेमध्ये हे महत्त्वाचे कॅच सोडले. त्यामुळे भारताच्या सुमार कामगिरीवर प्रश्न निर्माण झाला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : महिला टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत भारत आणि बांग्लादेश यांच्यातील महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाने फिल्डिंगमध्ये मोठी निराशा केली. भारताने सामना जिंकला असला तरी या विजयाशिवाय इतर बाबींचीही चर्चा होते आहे. विश्वविजेतेपदाचा दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाकडून पॉवरप्लेमध्येच तब्बल चार कॅच सुटल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. या सामन्यात टॉस जिंकून बांग्लादेशने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीपासूनच बांग्लादेशच्या फलंदाजांनी सावध खेळ करत धावफलक हलता ठेवला. मात्र या काळात भारतीय फिल्डर्सच्या मिळालेल्या संधी वाया घातल्याने सामन्यात वेगळेच चित्र पाहायला मिळाले आहे.
पॉवरप्लेमध्येच चार कॅच सुटले
तिसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर जुआरिया फर्डोसला जीवदान मिळाले. श्रीचरणीच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक यास्तिका भाटियाकडून कॅच सुटला. त्यानंतर चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर राधा यादवनेही जुआरिया फर्डोसचा कॅच हातातून सोडला. यावरच भारतीय संघाच्या चुका थांबल्या नाहीत. पाचव्या षटकात श्रीचरणीच्या गोलंदाजीवर शोभना मोस्तारीचा कॅच नंदिनी शर्माने सोडला. त्यानंतर लगेचच पुढील चेंडूवर जुआरिया फर्डोसलाही आणखी एक जीवदान मिळाले. नंदिनी शर्माकडून हा कॅचही पकडला गेला नाही. अशाप्रकारे अवघ्या पॉवरप्लेमध्ये भारताने चार महत्त्वाच्या संधी गमावल्या.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची चूक पुन्हा, पण भारत जिंकला
यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही भारतीय संघाने फिल्डिंगममध्ये अशाच चुका केल्या होत्या. त्याचा फटका संघाला पराभवाच्या रूपाने बसला होता. दरम्यान, या सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. बांगलादेशने भारतासमोर १३७ धावांचे आव्हान ठेवले होते. जे भारताने पार केले आणि विजयावर नाव कोरले. या सामन्याच्या विजयाची शिल्पकार शफाली वर्मा ठरली. तिच्या ३४ बॉलमधील ५३ धावांमुळे भारताचा स्कोर मोठा झाला. तिला प्लेअर ऑफ द मॅच हा अवॉर्डही मिळाला आहे.
हरमनप्रीत काय म्हणाली?
या सगळ्या कॅच ड्रॉपवर हरमनप्रीत म्हणाली, “होय, काही महत्त्वाचे कॅच सुटले हे सत्य आहे. पण हेच आमचे सर्वोत्तम फिल्डर्स आहेत. कधीकधी अशा गोष्टी घडतात आणि त्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवणे शक्य नसते. आम्ही याबाबत चर्चा केली असून अधिक मेहनत घेणे, सरावावर भर देणे आणि मैदानावर जास्त वेळ घालवणे यावर आमचा भर आहे. ती पुढे म्हणाली, “आज काही संधी हातातून निसटल्या, ही बाब नक्कीच निराशाजनक आहे. मात्र पुढचा सामना आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या सामन्यात संघ अधिक चांगल्या तयारीनिशी उतरेल आणि सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल, असा मला पूर्ण विश्वास आहे.”
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा