Sikandar Raza Marathi News : भारताने पहिल्याच सामन्यात झिम्बाब्वे संघाला पाणी पाजलं. सात विकेटने विजय मिळवत मालिकेत १- ० ने विजयाची सुरूवात केली आहे. या सामन्यानंतर झिम्बाब्वेचा कर्णधार रझा याने पराभवाचं वेगळंच कारण दिलं आहे.

सिकंदर रझा काय म्हणाला?
मला वाटतं की खेळपट्टी दर्जेदार नव्हती, सकाळच्या आद्रकतेचा परिणाम झाला होता. पण तो इतका वेळ टिकेल असे वाटले नाही. नवीन चेंडूने फलंदाजी करणं अवघड होतं. पण दुर्देवाने आम्ही पॉवर प्ले मध्ये चौकार मारू शकलो नाही. भारत जेव्हा फलंदाजीला आला त्यावेळी खेळपट्टी एकदम बरोबर होती आणि ती बराच वेळ टिकून राहिली होती. आशा करतो की पुढच्या सामन्यात आम्हाला चांगली खेळपट्टी मिळल. टॉस हरलो तरी त्याचा काही परिणाम होणार नाही. मारूमणी आणि माधेवेरे यांनी चांगली फलंदाजी केली आणि सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. आम्ही सकारात्मक घेऊ आणि पुढे पहिल्यांदा फलंदाजी केली तरी स्पर्धात्मक धावसंख्या उभारू शकू, असं सिकंदर म्हणाला.
Sachin Tendulkar : शॉर्टकटची संस्कृती देशाच्या भविष्याला कमकुवत करते, विद्यार्थांच्या भावना समजून घेण्यासारख्या- सचिन तेंडुलकर
सामनावीर मयांक यादवने सुरुवातीलाच झिम्बाब्वेच्या फलंदाजांना हादरे दिले, तर वैभव सूर्यवंशीने अवघ्या १८ चेंडूंत अर्धशतक झळकावत भारताचा विजय सोपा केला. हरारे स्पोर्ट्स क्लब मैदान वैभवसाठी खास ठरले आहे. याच मैदानावर त्याने १९ वर्षांखालील वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात ८० चेंडूंत १७५ धावांची खेळी केली होती. त्याच मैदानावर त्याने पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतकही साजरे केले.
IND vs ZIM 1st T20 : मन मोठं लागतं! कॅप्टन झाल्यावर मिळालेल्या पहिल्या विजयाचे दोघेच शिलेदार, श्रेयस अय्यरने जाहीरपणे घेतली नावे, पाहा कोण?
भारताने या मालिकेसाठी नवोदितांना अधिक संधी दिली आहे. शिवम दुबे वगळता भारतीय संघातील वेगवान गोलंदाजांकडे मिळून अवघ्या सात आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव होता. मात्र मयांक यादव आणि प्रिन्स यादव या यादव द्वयीने झिम्बाब्वेचे आघाडीचे फलंदाज स्थिरावू दिले नाहीत. झिम्बाब्वेची अवस्था ४ बाद ३२ अशी झाली होती. मयांक आणि प्रिन्स यांनी मिळून आठ षटकांत केवळ ३७ धावा देत चार विकेट घेतल्या. यानंतर वेस्ली मॅधेवेरे आणि तादिवानाशा मारुमणी यांनी सहाव्या विकेटसाठी ३७ चेंडूंत ५८ धावांची भागीदारी केली. त्यांनी शिवम दुबे आणि रवी बिश्नोई यांना लक्ष्य केले. या भागीदारीमुळे झिम्बाब्वेला १२५ धावांपर्यंत मजल मारता आली.
Mayank Yadav : 19 चेंडूंत अर्धशतक करूनही वैभवला पुरस्कार नाही; मयंक यादवच का ठरला सामनावीर?
हरारे स्टेडियमवर भारतीय पाठीराख्यांची संख्या लक्षणीय होती. त्यांना भारतीय फलंदाजीची उत्सुकता होती आणि वैभव सूर्यवंशीने त्यांना दिली. त्याने पॉवरप्लेमध्येच १७ चेंडूंत ४८ धावा फटकावल्या. पुढील चेंडूवर त्याने अर्धशतक पूर्ण केले. मात्र वैभव अखेरपर्यंत टिकू शकला नाही. ईशान किशनने २४ चेंडूंत ३५ धावा करत श्रेयस अय्यरसह भारताचा विजय अधिक सोपा केला. श्रेयसने नाबाद २८ धावांची संयमी खेळी करत भारताला १३.२ षटकांत विजय मिळवून दिला.

