ind vs ban women t20 world cup india win shafali star; कॅच सुटले पण मॅच नाही! भारताने बांगलादेशला नमवलं, सेमीफायनलच्या आशा कायम, कोण ठरलं विजयाचा शिल्पकार?
ind vs ban women t20 world cup india win shafali star; कॅच सुटले पण मॅच नाही! भारताने बांगलादेशला नमवलं, सेमीफायनलच्या आशा कायम, कोण ठरलं विजयाचा शिल्पकार?
India Win Against Bangladesh T-20 World Cup 2026 : भारत आणि बांगलादेश महिला संघांमध्ये सुरु असलेल्या सामन्यामध्ये भारताचा विजय झाला आहे. टी-२० विश्वचषकातील या सामन्यात भारताला विजय मिळवणं अत्यंत गरजेचं होतं. भारतीय महिला संघाने बांगलादेशचा ५ विकेट्सने पराभव केला. राधा यादव-श्री चरणी यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम राहिल्या आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: सुरुवातीला फिल्डिंगच्या झालेल्या चुका, हातातून निसटलेले कॅचआणि वाढलेला दबाव हे सर्व एकीकडे पण भारतीय महिला संघाने पुन्हा एकदा लढवय्यी वृत्ती दाखवत बांगलादेशवर महत्त्वाचा विजय मिळवला. या विजयासह हरमनप्रीत कौरच्या संघाने टीटी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या आशा जिवंत केल्या आहेत. सामन्याच्या सुरुवातीलाच भारतीय खेळाडूंनी काही सोपे कॅच सोडल्याने बांगलादेशला मोठी संधी मिळाली होती. जुएरिया फिरदोस, सोभना मोस्तरी आणि कर्णधार निगार सुल्ताना यांनी त्याचा फायदा घेत संघाचा डाव सावरला. मात्र, श्री चरणी आणि राधा यादव यांनी सामन्याचे चित्र बदलून टाकले. दोघींच्या अचूक गोलंदाजीसमोर बांगलादेशचा डाव ८ बाद १३६ धावांवरच आटोपला.
भारताची खेळी
१३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला स्मृती मानधनाच्या रूपाने लवकर धक्का बसला. पण शफाली वर्माने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत बांगलादेशच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. तिच्या धडाकेबाज फटकेबाजीमुळे भारताने पॉवरप्लेमध्ये धावांचा पाऊस पाडला. शफालीने केवळ ३४ चेंडूंत ५३ धावांची तडाखेबंद खेळी करत विजयाचा पाया रचला. मात्र तिची विकेट पडताच सामना पुन्हा रंगतदार झाला. यास्तिका भाटीया आणि रिचा घोषही लवकर बाद झाल्याने बांगलादेश सामन्या परतल्याचे वाटत होते. पण जेमिमा रॉड्रिग्जने संयमी आणि आक्रमक खेळीचा सुरेख मिलाफ साधत भारताला लक्ष्याच्या जवळ पोहेचवले. अखेरीस कर्णधार हरमनप्रीत कौरने शांतपणे जबाबदारी सांभाळत संघाला विजयरेषा पार करून दिली. त्यानंतर भारताने ५ विकेट्स राखून हा महत्त्वाचा सामना जिंकला आणि विश्वचषकातील पुढील वाटचालीसाठी स्वतःला शर्यतीत कायम ठेवले आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा