पण अशा कोणत्याही नोटीसवर क्लिक करण्यापूर्वीस्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न विचारा – ही खरोखर प्राप्तिकर विभागाची अधिकृत नोटीस आहे का? की तुमची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरण्याच्या उद्देशाने रचलेला एखादा फसवणुकीचा स्कॅम आहे?
बनावट आयकर नोटीसला प्रतिसाद देण्याचे प्रकार
कोणत्याही प्रकारच्या बनावट नोटीसला प्रतिसाद दिल्यास तुमची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती फसवणूक करणाऱ्यांसमोर उघड होण्याचा धोका असतो. त्यामुळे तुम्हाला आयकर विभागाच्या नावे मिळालेली नोटीस बनावट आहे की खरी याची खात्री करण्याची संधी मिळते, ज्यामुळे तुम्ही फसवणुकीला बळी पडण्यापासून वाचू शकतात.
फसवणूक करणारे अगदी खऱ्यासारख्या दिसणाऱ्या बनावट नोटीस पाठवून लोकांची फसवणूक करत आहेत, पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला मिळालेली सूचना अधिकृत आहे की बनावट, हे तुम्ही फक्त 5 मिनिटांत स्वतः तपासून खात्री करू शकता.
China AI Plan: चीनचा एआयच्या माध्यमातून जगावर राज्य करण्याचा गेमप्लॅन; भारतासह सर्वांसमोर मोठे संकट उभे करणार?; एका चालीने चेकमेट करणार
DIN काय असतं? तुमच्या ओळखीचा सर्वात महत्त्वाचा पुरावा
आयकर विभागाकडून येणाऱ्या प्रत्येक अधिकृत पत्रावर एक विशिष्ट क्रमांक असतो, ज्याला Document Identification Number किंवा DIN म्हणतात. हा 20 अंकी नंबर कम्प्युटरने तयार केलेला युनिक क्रमांक असतो. तुमच्या नोटीसवर DIN नसेल तर ती बनावट असण्याची शक्यता आहे.
पोर्टलवर पडताळणी कशी करावी?
आयकर विभागाची नोटीस मिळाल्यावर तात्काळ कोणतेही पेमेंट करू नका किंवा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. सर्वप्रथम खालील दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करा:
- आयकर विभागाच्या अधिकृत ई-फायलिंग वेबसाइटवर (incometax.gov.in) जा.
- तिथे Authenticate Notice/Order Issued by ITD हा पर्याय दिसेल.
- नोटीसवर छापलेला DIN क्रमांक प्रविष्ट करा.
- नोटीस खरी असेल तर संपूर्ण तपशील पोर्टलवर दिसेल. तुम्ही पोर्टलमधील e-Proceedings विभागात जाऊन देखील नोटीसची सत्यता तपासू शकता.
खालील गोष्टींकडे विशेष लक्ष द्या
- तुमचा ई-मेल आयडी तपासा: ई-मेल नेहमी अधिकृत डोमेन @incometax.gov.in वरून आला आहे की नाही याची खात्री करा.
- वैयक्तिक तपशील: नोटीसमध्ये तुमचा पॅन कार्ड क्रमांक आणि नाव बरोबर लिहिले आहे का तपासा.
- घाई करू नका: आयकर तज्ञ नोटीस मिळाल्यावर लगेच प्रतिक्रिया न देण्याचा सल्ला देतात. प्रथम काळजीपूर्वक वाचा आणि कोणत्या कलमांतर्गत (जसे की 143(1) किंवा 139(9)) आहे ते पहा.
लक्षात घ्या की पडताळणी किंवा पुनर्मूल्यांकन यासारख्या काही नोटिसा खूप गंभीर असतात आणि त्यांच्यासाठी कडक मुदत असते. त्यामुळे एखाद्या नोटीसच्या महत्त्वाविषयी तुम्हाला खात्री नसल्यास ताबडतोब कर सल्लागार किंवा CA चा सल्ला घ्या.

