हरियाणा राज्यातील रहिवासी मिस्टर राठी यांना 14 वर्षानंतर एक मोठ्या तणावातून सुटका मिळाली आहे. आयकर विभागाकडून आलेल्या नोटीशीना दुर्लक्षित केल्यामुळे त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. 2019 साली विभागाकडून नोटीशी येण्यास सुरुवात झाली. पण जेव्हा उत्पन्नावरचा कर वाढवण्यात आला, तेव्हा राठी यांना जाग आली. अखेर, मोठ्या कसरतीनंतर राठी यांना या संपूर्ण प्रकरणातून सुटका मिळाली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?
प्रकरण असे आहे की मिस्टर राठी प्रॉपर्टी डीलर आहेत. त्यामुळे प्रॉपर्टीचा विक्रेता आणि ग्राहक यांच्या मध्ये मध्यस्थीचे काम ते गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. 2011-12 च्या दरम्यान, एका प्रॉपर्टी डीलमध्ये ग्राहकाकडून प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी राठी यांना 54 लाखांची रक्कम देण्यात आली. राठी यांनी ती रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली. पुढे तीच रक्कम विक्रेत्याच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली.
बँकेत जमा करण्यात आलेली रक्कम ही राठी यांची नव्हती. परंतु, 2019 मध्ये आयकर विभागाच्या लक्षात आले की राठी यांनी काही वर्षांपूर्वी त्यांच्या खात्यात 54 लाखांची रक्कम जमा केली होती. या उत्पन्नाची नोंद त्यांनी संबंधित आयकर विभागात केली नाही. तसेच या रक्कमेवर लागणाऱ्या टॅक्सपासूनही स्वतःचा बचाव केला. या दरम्यान, आयकर विभागाने राठी यांना अनेका नोटीशी पाठवल्या. राठी यांनी त्या नोटीशीला दुर्लक्षित केले. त्यावर काहीच उत्तर नोंदवला नाही. नोटीशीला राठी यांच्याकडून काहीच उत्तर न मिळाल्यामुळे शेवटी आयकर अधिकाऱ्यांनी त्या 54 लाखांना अघोषित उत्पन्न म्हणून घोषित केले आणि राठी यांच्या करपात्र उत्पन्नात जोडण्यात आले. यामुळे राठी यांच्यावर कराची जबाबदारी वाढली.
वाढलेले कर लक्षात घेताच राठी यांनी आयकर विभागाकडे धाव घेतली. राठी यांनी CTI-A कडे तक्रार केली पण तिथे त्यांना दिलासा मिळाला नाही. पुढे राठी यांनी ITAT दिल्ली येथे धाव घेतली. तिथे या संपूर्ण प्रकरणावर मोठी तपासणी झाली. राठी यांनी 2011-12 काळात केलेले व्यवहार आणि त्या संबंधीतचे सर्व पुरावे सादर केले. त्या 54 लाख रक्कमेसंबंधित ग्राहक-विक्रेताच्या ITAT कडून नोंदी घेण्यात आल्या. ग्राहकांची 7 शपथपत्र, बँक स्टेटमेंट, बँक पासबुक तसेच 8 सेल डीड्स सादर करण्यात आले. संपूर्ण तपासानंतर 2026 मध्ये या प्रकरणातून राठी यांना मुक्तता मिळाली.
Gold Rate: 1947 पासून सोने 1726 पट महागले; 80 वर्षांत 1.53 लाखांच्या पुढे, 10 हजारांच्या सोन्याचे आज किती झाले असते?एकंदरीत, राठी यांनी मध्यस्थी म्हणून ग्राहकाकडून 54 लाख रुपये रक्कम घेतली आणि ती स्वतःच्या बँक खात्यात डीपोजिट करून पुढे विक्रेताच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली. काही वर्षांनी ही गोष्ट आयकर विभागाच्या लक्षात आली. विभागाने नोटीशी पाठवल्या पण त्या आधी दुर्लक्षित केल्यामुळे पुढे राठी यांना अनेक वर्षांसाठी आयकर विभागाच्या फेऱ्या माराव्या लागल्या. मोठ्या तपसानंतर राठी यांची या संपूर्ण प्रकरणातून सुटका झाली आहे.

