Important update for local train passengers in mumbai night block on western line; मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक
Important update for local train passengers in mumbai night block on western line; मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक
Mumbai News: शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार असल्याने रविवारी ५ जुलै रोजी पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.
mumbai local block(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: पश्चिम रेल्वेवर सलग चौथ्या दिवशी प्रवाशांना लोकलविलंबाचा त्रास सहन करावा लागला. मरिन लाइन्ससह विरार स्थानकात सिग्नल बिघाड झाल्याने शुक्रवारी सकाळी गर्दीच्या वेळेत लोकल वाहतुकीला फटका बसला. याचा परिणाम दिवसभर धावणाऱ्या लोकल फेऱ्यांवर झाल्याने लोकल २० ते २५ मिनिटे विलंबाने धावत होत्या.
मरिन लाइन्स स्थानकात डाऊन मार्गावर पहाटे ५.३० च्या सुमारास सिग्नलबिघाड झाला. यामुळे लोकल वाहतूक खोळंबली. पहाटेची वेळ असल्याने तातडीने दुरुस्तीकाम सुरू करण्यात आले. सुमारे २० मिनिटानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. हा बिघाड दुरुस्त होऊन लोकल पूर्वपदावर येत असतानाच सकाळी ७च्या सुमारास विरार स्थानकातील सिग्नल बिघडला. परिणामी, विरारहून चर्चगेट दिशेला रवाना होणाऱ्या लोकलना सिग्नल न मिळाल्याने त्या जागीच खोळंबल्या. सुमारे अर्धा तासानंतर सिग्नल सुरू झाला. त्यानंतर लोकल वाहतूक पुन्हा सुरू झाली.
शनिवारी रात्रकालीन ब्लॉक
पश्चिम रेल्वेने वसई रोड ते वैतरणादरम्यान शनिवारी रात्री ११.५५ ते रविवारी पहाटे ४.३०पर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घोषित केला आहे. या वेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. यामुळे लोकल सुमारे २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत. ब्लॉकवेळेत अप आणि डाउन जलद मार्गावरील लोकल अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. हार्बर लोकलवर दगडफेक, गार्ड जखमी
हार्बर मार्गावरील धावत्या लोकलवर अज्ञात व्यक्तीने केलेल्या दगडफेकीत लोकलमधील गार्ड गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे जुईनगर आणि नेरुळ रेल्वे स्थानकादरम्यान घडली. सुनीलकुमार उपेंद्र प्रसाद (४८) असे या गार्डचे नाव आहे. सुनीलकुमार शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास वडाळा-पनवेल लोकल घेऊन निघाले होते. पावणेसहा वाजता त्यांची लोकल जुईनगर व नेरुळ स्थानकादरम्यान आली असता एका अज्ञात व्यक्तीने लोकलवर दगड फेकला. दगड सुनीलकुमार यांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईच्या वरच्या बाजूला आदळला. रक्तबंबाळ अवस्थेतही सुनीलकुमार यांनी लोकल न थांबवता सुरक्षितपणे पनवेल स्थानकापर्यंत आणली. त्यानंतर त्यांना तातडीने पनवेल येथील लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या तक्रारीवरून वाशी रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा