Important news for farmers Where to lodge complaint if you havent received loan waiver; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पात्र असतानाही कर्जमाफी मिळाली नसल्यास कुठे करावी तक्रार? जाणून घ्या
Important news for farmers Where to lodge complaint if you havent received loan waiver; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पात्र असतानाही कर्जमाफी मिळाली नसल्यास कुठे करावी तक्रार? जाणून घ्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीची योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात १६ लाख ९६ हजार २०१ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यापैकी चार लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे.
कर्जमाफी योजनेबाबत राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी पुण्यात मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘कर्जमाफी योजनेत ५६ लाख शेतकरी असून, ३२ लाख शेतकरी कर्जमाफी आणि एकवेळ समझोता योजनेचे (ओटीएस) आहेत, तर उर्वरित २४ लाख प्रोत्साहनपर लाभाचे आहेत. पहिल्या टप्प्यात १६ लाख ९५ हजार शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यापैकी सुमारे चार लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. उर्वरित १५ लाख पाच हजार शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण, व्याज आकारणी याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. हा डेटा बँकांना देऊन शेतकऱ्यांची नवी यादी प्रसिद्ध होईल. या योजनेत लोकप्रतिनिधी, प्राप्तिकर, सेवार्थ, शालार्थ आदी शेतकऱ्यांचा समावेश नाही.’ राष्ट्रीयीकृत, खासगी बँकांकडील कर्जखाती जास्त आहेत. या बँका ‘एनपीए’ खात्यांना सूट देत असतात. त्यामुळे या बँकांच्या एकवेळ तडजोड (ओटीएस) योजनेचा अभ्यास केला. कर्जमाफी योजनेंतर्गत ‘हेअर कट’ धोरण राबविण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार पाच वर्षांपूर्वीच्या ‘एनपीए’ खात्यावर बँकांना व्याज देणार नाही; तसेच एक वर्ष जुने ‘एनपीए’ खाते असल्यास मुद्दलाच्या ८५ टक्के, सर्वांत जुने ‘एनपीए’ खाते असल्यास मुद्दलाच्या ३५ टक्क्यांत खाते सेटल करून देण्याचे ठरले आहे. कर्जमाफी योजनेत थकबाकी ३० सप्टेंबर २०२५, तर ३१ मार्च २०२६ पर्यंतची कर्जबाकी सरकार देणार आहे,’ असेही सहकार आयुक्त तावरे यांनी स्पष्ट केले.
तक्रार निवारणासाठी स्वतंत्र पोर्टल
राष्ट्रीयीकृत, व्यावसायिक बँकांकडून कर्ज घेतलेल्यांची ३१ मार्च २०२६ची थकबाकी दिसण्याऐवजी तडजोडीची रक्कम दिसत आहे. ही रक्कम दोन लाखांपेक्षा कमी असल्याने कर्जमाफी झाल्याचे शेतकऱ्यांना वाटत आहे. संबंधित शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक शाखेत जाऊन, कर्जमाफी पोर्टलवरील बॅलन्स तपासावा. कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक, नाव, रक्कम चुकली आहे, आदींसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती करण्यात आली आहे. तेथे तक्रार करण्याचे आवाहन सहकार आयुक्त तावरे यांनी केले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा