Headlines

IMD forecast heavy rain warning for maharashtra orange alert for mumbai and red alert for 6 districts; महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट; मुंबईत काय स्थिती? 5 दिवसांसाठी IMD चा अंदाज


मुंबई: राज्यात यंदा उशिरा मान्सून सक्रिय झाल्याने सर्वांनाच पावसाची ओढ लागली होती. अखेर आता जूनअखेरीस राजधानी मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून पुढील काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. कोकणातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता असल्याचं हवामान कात्याने सांगितलं आहे. तसंच राज्यातील एकूण सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून शहराला पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहरात पहिल्याच मोठ्या पावसात सखल भागांमध्ये पाणी साचून काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं असतानाच आता पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने मुंबईकरांना कामानिमित्त बाहेर पडताना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.

कोणत्या जिल्ह्यांना कधी रेड अलर्ट?

रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यासोबतच पालघर जिल्ह्याला २ जुलै रोजी, ठाणे जिल्ह्याला ४ जुलै रोजी, रायगड जिल्ह्याला ३ जुलै आणि ४ जुलै रोजी, सातारा जिल्ह्यातील घाट परिसराला ५ जुलै, तर पुणे जिल्ह्यातील घाटपरिसरात २ जुलै, ३ जुलै आणि ४ जुलै या कालावधीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला. या कालावधीत सदर जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी आणि उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी आज मध्यम स्वरुपाच्या तसेच मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे. तर दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस कोसळू शकतो, असा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.

दरम्यान, उशिरा का होईना समाधानकारक पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला असून पेरणीच्या कामाला वेग येणार आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत