Headlines

Hrishikesh Joshi : ‘ब्रह्मांड आठवलं, प्लॅटफॉर्म दिसताच उडी मारली’, मुंबईत पहिलाच दिवस, हृषिकेश जोशींनी सांगितला लोकलनं प्रवास करण्याचा अनुभव


Hrishikesh Joshi : हृषिकेश जोशी यांनी एका मुलाखतीमध्ये मुंबईत पहिल्यांदाच लोकलनं प्रवास करण्याचा अनुभव सांगितला आहे.

Hrishikesh Joshi On Mumbai Local
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – हृषिकेश जोशी हे मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते असून त्यांनी अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. सिनेसृष्टीत आपलं नशीब आजमावण्यासाठी हृषिकेश यांनी कोल्हापूर सोडून मुंबई गाठली. मुंबईतमधील पहिलाच दिवस त्यांच्यासाठी भयानक अनुभव ठरला. याबद्दल हृषिकेश यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

हृषिकेश जोशी यांनी सांगितला प्रसंग

मुलाखतीदरम्यान हृषिकेश जोशी म्हणाले की, ‘मी २७ जून १९९७ रोजी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी मुंबईत स्थायिक झालो. त्यावेळी मोबाईल नव्हते, कास्टिंग एजन्सी नव्हत्या. संपर्काने कामं व्हायची. वेगवेगळ्या दिग्दर्शकांना जाऊन भेटायला लागायचं. त्यावेळी असं कळलं की, पंकज पराशर एक सिनेमा करणार होते. त्याबद्दल मला कोणीतरी सांगितलेलं आणि त्यांचा पत्ता दिलेला. मुंबईतला माझा पहिला दिवस. मालाडवरून अंधेरीला मला जायचं होतं आणि मला वाटलं १०ची वेळ दिलेली आहे. मी विचार केला ९ वाजता लोकलने जाऊ.’

एकवेळ सायली आम्हाला सोडवेल पण प्रिया नाहीच! ‘ठरलं तर मग’ मालिकेतील खलनायकांसोबत गप्पा

‘मी मालाड स्टेशनला सकाळी मरण्याच्या गर्दीत ट्रेनच्या खिडकीला पकडून जसे काही लोक उभे असतात तसा मी उभा राहिलो. आता गोरेगाव आणि जोगेश्वरीच्या मध्ये जे राम मंदिर स्थानक आहे, ते त्यावेळी नव्हतं. खूप जास्त अंतर होतं दोन्ही स्टेशनमध्ये. एका पॉईंटला माझ्या हाताला जी रग आली, त्याने मला ब्रह्मांड आठवलं. परमेश्वराचा धावा करून मी घट्ट पकडलेलं. जसा प्लॅटफॉर्म दिसला, तशी मी उडी मारली. तिथूनच मी नमस्कार केला आणि म्हणालो, हा शेवटचा आगाऊपणा. मी जोगेश्वरीला उतरून बसने अंधेरीला गेलो.’ असं हृषिकेश यांनी पुढे सांगितलं. ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये हृषिकेश जोशी बोलत होते.

Maharashtra TimesMaharashtrachi Hasyajatra Fame Viraj Jagtap : बालनाट्यापासून सुरुवात, अभिनयात करिअर करण्याचं स्वप्न उराशी पण आर्थिक तंगी, हास्यजत्रेनं पालटलं नशीब; डोळे पाणावणारा विराज जगतापचा संघर्ष
दरम्यान, हृषिकेश जोशी यांनी अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक छोटी मोठी कामं केली. त्यांनी बी.एस.सी. आणि बी.एडचं शिक्षण पूर्ण केलं असून ते एक उत्तम क्रीडापटू देखील आहेत. त्यांनी माध्यमिक शाळेत गणित आणि विज्ञान हे विषय शिकवले. केवळ अभिनयच नाही, तर सेटवर मेकअप करणं, डबिंग दिग्दर्शन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत कुशलतेनं पार पाडल्या आहेत.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा