Headlines

How To Invest in Fixed Deposits; 20 लाखांची एकच FD की 5 लाखांच्या वेगवेगळ्या मुदत ठेवी? नका करु घाई, एक गोष्ट ठरेल नुकसानदायी! पश्चातापाची वेळ येईल


Investment Strategy: आजच्या काळात बाजारात गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असले तरीही, बहुतेक सर्वसामान्य लोक आपल्या कष्टाची कमाई सुरक्षित ठेवण्यासाठी मुदत ठेवींकडे वळतात. एफडीमध्ये परतावा कमी असला तरीही खात्रीशीर असतो. तुम्हाला एफडीमध्ये 10 लाख किंवा 20 लाख रुपये गुंतवायचे असतील, तर केवळ सर्वाधिक व्याजदर शोधणे पुरेसे नाही आणि योग्य धोरण अवलंबणेही महत्त्वाचे आहे.

सामान्यतः स्मॉल फायनान्स बँका किंवा छोट्या खाजगी बँका जास्त व्याज देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात, पण यामध्ये जोखीमही असते. तसेच प्रत्येक बँक खात्यावर5 लाख रुपयांपर्यंतच विमा संरक्षण देते. त्यामुळे, संपूर्ण रक्कम एकाच एफडीमध्ये गुंतवण्याऐवजी वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये विभागणे अधिक सुरक्षित, फायदेशीर आणि शहाणपणाचे ठरेल.

Maharashtra Timesपटापट पेमेंट करण्यासाठी UPI वापरत असाल तर आता वेळ लागणार, डिजिटल पेमेंटची पद्धत बदलली

एकाच एफडीमध्ये मोठी रक्कम गुंतवू नका!

एका एफडीमध्ये मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी छोट-छोट्या एफडींमध्ये गुंतवणूकीचा फायदा म्हणजे की गरजेच्या वेळी तुम्हाला चांगली तरलता मिळते. उदाहरणार्थ, तुम्ही 20 लाख प्रत्येकी 5 लाखांच्या चार एफडींमध्ये विभागली आणि तुम्हाला अचानक 5 लाखांची गरज भासल्यास तुम्हाला संपूर्ण 20 लाखांची एफडी मोडायची गरज पडणार नाही. फक्त एक एफडी मोडून तुमची गरज पूर्ण होईल आणि तुमच्या उर्वरित तीन एफडी कोणत्याही नुकसानीशिवाय परतावा देत राहतील.

Maharashtra TimesSecond Home Buying: एक घर असताना इन्व्हेस्टमेंट म्हणून दुसरे घर घेताय? तेही कर्ज काढून? गुंतवणूक करण्यापूर्वी नक्की तपासा 8 महत्त्वाच्या गोष्टीव्याज दरातील चढ-उतारांपासून संरक्षण

वेगवेगळ्या मुदतपूर्तीच्या कालावधीत विभागण्याच्या प्रक्रियेला ‘एफडी लॅडरिंग’ म्हणतात. तुम्ही पाच वर्षांसाठी 20 लाख एकच एफडी करण्याऐवजी दोन आणि पाच वर्षांच्या एफडीमध्ये विभागले, तर तुम्हाला कालांतराने मिळणाऱ्या व्याज दरवाढीचा फायदा होऊ शकतो. तुमची 2 वर्षांची एफडी मॅच्युरिटीला येते, तेव्हा तुम्ही नवीन व्याजदराने पुन्हा गुंतवणूक करू शकता. अशाप्रकारे, तुमचे पैसे एकाच व्याजदरात दीर्घकाळ अडकून राहत नाहीत.

Maharashtra TimesNew Labour Code: पगारवाढ होऊनही CTC च्या तुलनेत हातात कमी पगार का? लेबर कोडमुळे तुमच्या टेक-होम सॅलरीपासून ते ग्रॅच्युइटीपर्यंत काय-काय बदललं

एकापेक्षा जास्त FD करण्याचे फायदे

  • अचानक पैशांची गरज भासली, तर संपूर्ण एफडी मोडण्याची गरज नाही.
  • गरज भासल्यास एक एफडी मॅच्युरिटीआधी मोडून गरज पूर्ण करू शकता.
  • वेगवेगळ्या मुदतीसाठी एफडी केल्यास पैसा जास्त काळ अडकून राहत नाही.
  • रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, 5 लाख किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या एफडी पूर्णपणे सुरक्षित आहेत.
  • तुमच्या गरजेनुसार वेगवेगळ्या एफडी वापरू शकता.
  • मोठी एफडी मुदतपूर्व मोडल्यास संपूर्ण रकमेवर दंड लागतो.

आर्थिक उद्दिष्टांनुसार निधीचे व्यवस्थापन करा

गुंतवणूकदार मुदत ठेवीकडे केवळ बचतीचे साधन म्हणून पाहतात. पण, मुदत ठेवींना आर्थिक उद्दिष्टांशी जुळवून घेणे फायदेशीर ठरेल. एफडींना तुम्ही वेगवेगळ्या गरजांनुसार टॅग करू शकता, ज्यामुळे कोणता निधी कोणत्या उद्देशासाठी आहे याची ओळख पटेल आणि तुमच्या दीर्घकालीन बचतीशी तडजोड न करता आर्थिक व्यवस्थापन सोपे होईल.

एकपेक्षा जास्त एफडीमध्ये पैसा विभागण्याचे तोटे

दुसरीकडे, तुम्ही वेगवेगळ्या एफडीमध्ये छोट-छोट्या हप्त्यांमध्ये विभागणी केल्यास फायदेशीर आहे, पण त्याचे तोटेही जाणून घेतले पाहिजे. असं केल्यास सर्वात मोठं आव्हान म्हणजे की अनेक एफडींचे व्यवस्थापन करणे. गुंतवणूकदारांना मॅच्युरिटीच्या वेगवेगळ्या तारखा, नूतनीकरण आणि वेगवेगळ्या बँकांकडील कागदपत्रांचा मागोवा ठेवणं कठीण असतं. याशिवाय आयकर विवरणपत्र भरताना सर्व एफडींवर मिळणाऱ्या व्याजाची गणना करणे थोडे अवघड होऊ शकते.