Headlines

How Do Mumbaikars Do This Korean Tourists Mumbai Local Experience Goes Viral | मुंबईकर हे काम कसं करतात? उडी मारून पकडली चालती ट्रेन, पाहून कोरियन पर्यटकाला बसला धक्का, पाहूनच त्याचे पाय थरथरले


Mumbai Local Viral Video: मुंबई लोकलचा पहिलाच अनुभव घेणाऱ्या कोरियन पर्यटकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मुंबईची गर्दी पाहूनच त्याला घाम फुटला. खूप प्रयत्न करूनदेखील त्याला ट्रेनमध्ये चढता आलं नाही. पण या अनुभवातून त्याचा मुंबईकरांबद्दलचा आदर आणखी वाढला.

Mumbai Local Train
(फोटो सौजन्य – @ChhabriaAshmita/x.com)
मुंबई लोकलनं प्रवास करणं हे किती कठीण असतं, हे फक्त मुंबईकरच सांगू शकतो. तुम्ही दिवसभरात कुठल्याही वेळेला जा, लोक सतत प्रवास करताना दिसतात. त्यामुळेच बहुदा मुंबईकर हे घड्याळाच्या काट्यावर धावतात, असं म्हटलं जातं. असो, पण हाच अनुभव घेण्यासाठी एक कोरियन पर्यटक मुंबईत आला. त्यानं ठाणे ते CSMT असा प्रवास करण्याचा प्रयत्न केला. पण कित्येक तास प्लॅटफॉर्मवर उभं राहूनसुद्धा त्याला एकही गाडी पकडता आली नाही. अखेर तो टॅक्सीनं इच्छित स्थळी पोहोचला. पण मुंबई लोकलनं प्रवास करता न आल्याची खंत त्यानं एका इन्स्टाग्राम व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त केली. आणि आता हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

काय म्हणाला पर्यटक?

दक्षिण कोरियातून आलेल्या या पर्यटकाचं नाव सेजिन असं आहे. त्यानं आपल्या Sejinandworld या इन्स्टाग्राम हँडलवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये त्यानं मुंबई लोकलचा अनुभव शेअर केलाय. तो म्हणतोय, ठाणे स्टेशनवर त्यानं १७० रुपयांचं रिटर्न तिकीट काढलं आणि लोकल ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करू लागला. पण प्रचंड गर्दी आणि लोकलचा वेग पाहून तो गोंधळला. कारण लोकं ट्रेन थांबण्यापूर्वीच त्यामध्ये धडाधड उड्या मारत होते. त्यानं एकामागून एक दोन ट्रेन सोडल्या. त्याला कुठल्याच ट्रेनमध्ये चढता आलं नाही. अखेर त्यानं लोकल ट्रेनचा नाद सोडला आणि थेट टॅक्सी पकडून पुढचा प्रवास सुरू केला.

मुंबईकरांनी दिल्या टीप्स

पण या व्हिडीओमध्ये त्यानं मुंबईकरांचं कौतुकदेखील केलंय. तो म्हणतोय, मुंबईकरांबद्दलचा आदर आणखी वाढला. कारण असा संघर्षमय प्रवास करूनदेखील ते वेळेवर ऑफिसला पोहोचतात. इतर देशांतील लोकं इतक्या गर्दीमध्ये उभं राहण्याचीदेखील हिंमत करणार नाहीत. असो, हा व्हिडीओ ९ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेलाय. पण या व्हिडीओखाली मुंबईकरांनी प्रतिक्रिया देत मुंबई लोकलनं प्रवास करण्यासाठी काही सोप्या टिप्ससुद्धा दिल्या आहेत. कोणी म्हणतंय, दुपारच्या वेळेस प्रवास करा, कारण तेव्हा गर्दी थोडी कमी असते. तर कोणी AC लोकलनं प्रवास करण्याचा सल्ला देतंय. असो, तुम्ही या कोरियन पर्यटकाला मुंबई लोकलबद्दल काय सांगाल?

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा