Headlines

Housing Society Common Amenities Rules; एकाच सोसायटीतील रहिवाशांना जिम, स्विमिंग पूलसारख्या सुविधा नाकारणे चुकीचे; नवीन घर घेण्यापूर्वी खरेदीखत नक्की तपासा

Housing Society Rules: बेंगळुरूच्या सोसायटीतील रहिवाशांना एका गृहनिर्माण सुविधांसंबंधी कोर्टाकडून निराशेला सामोरे जावे लागले आहे. विक्री करारामध्ये शेजारच्या सोसायटीला वापराची स्पष्ट परवानगी होती, ही वस्तुस्थिती न्यायालयांनी सातत्याने मान्य केली. ही परिस्थिती सर्व खरेदीदारांनी पुढील कार्यवाही करण्यापूर्वी आपल्या विक्री करारातील अटींचे सखोल पुनरावलोकन करण्याची आवश्यकता अधोरेखित करते.

common facilities in flats
गृहनिर्माण संस्थांमधील सामायिक सुविधा व त्या वापराचे अधिकार
Property Rules: एकच बिल्डर आहे आणि त्याच्या मालकीच्या जवळपास अनेक गृहनिर्माण सोसायट्या आहेत. अनेकदा एका सोसायटीतील रहिवासी दुसऱ्या सोसायटीच्या कॉमन सुविधा – जसे की क्लबहाऊस, स्विमिंग पूल, रस्ते, पदपथ, जिम आणि एन्ट्री गेट – वापरू लागतात. अशा परिस्थितीत प्रश्न निर्माण होतो की असं करणं कायदेशीर आहे का? आणि फ्लॅट मालक याला आक्षेप घेऊ शकतात का?

अशाच एका प्रकरणात अलीकडे कर्नाटक उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला. कोर्टाने सांगितले की फ्लॅटच्या नोंदणीकृत Sale Deed मध्ये इतर सोसायट्या किंवा प्रकल्पांमधील लोकांकडून सामायिक सुविधांच्या वापराचा उल्लेख असल्यास फ्लॅट मालक या सुविधांवर एकाधिकाराचा दावा करू शकत नाही.

फ्लॅट घेताना घ्यायची काळजी

फ्लॅट घेताना घ्यायची काळजी

अशा परिस्थितीत, फ्लॅट खरेदी करताना ग्राहकांनी केवळ घराची किंमत, कार्पेट एरिया आणि ठिकाण पाहणे पुरेसे नाही. सामायिक सुविधांबाबत आपले हक्कही समजून घेतले पाहिजे जेणेकरून भविष्यात कोणतेही वाद होणार नाही. घर खरेदी करण्यापूर्वी विक्री करार आणि प्रकल्पाशी संबंधित सगळी कागदपत्रे काळजीपूर्वक चेक का केली पाहिजे आपण खालील उदाहरणाद्वारे समजून घेऊया.

कॉमन सुविधांबाबत या वादाचे कारण काय?

कॉमन सुविधांबाबत या वादाचे कारण काय?

बेंगळुरूमधील कोथनूर येथील ‘आर्या गृह’ या एकाच बिल्डरने बांधलेल्या दोन गृहनिर्माण प्रकल्पांशी संबंधित आहे. पहिला प्रकल्प आर्या हमसा 2015 मध्ये पूर्ण झाला आणि भोगवटा प्रमाणपत्र – OC – मिळाले. त्यानंतर, बिल्डरने जवळच आर्या हमसा ग्रांदे नावाचा दुसरा प्रकल्प बांधला ज्याची K-RERA मध्ये नोंदणी झाली आणि 31 जानेवारी 2019 रोजी ओसी प्रमाणपत्र मिळाले.

या दोन्ही प्रकल्पांचे करार, जमिनीचा मालक आणि मंजूर आराखडे वेगवेगळे होते, पण क्लबहाऊस, रस्ते, पायवाटा, एन्ट्री-एक्झिट दरवाजे आणि इतर सामायिक सुविधा दोन्ही सोसायट्यांसाठी समान होत्या. जेव्हा आर्या हमसा ग्रांदेच्या रहिवाशांनी या सुविधा वापरण्यास सुरुवात केल्यावर आर्या हमसाच्या रहिवाशांनी विरोध केला आणि अखेरीस प्रकरण न्यायालयात पोहोचले.

सेल डीड महत्त्वाचे का?

सेल डीड महत्त्वाचे का?

या प्रकरणातून नोंदणीकृत विक्री करारामध्ये नमूद अटी अत्यंत महत्त्वाच्या असतात, हा सर्वात मोठा धडा आहे. केवळ ब्रोशर किंवा बिल्डरच्या आश्वासनांवरून एखादी सुविधा फक्त तुमच्याच सोसायटीसाठी आहे, असं गृहीत धरणं चुकीचे आहे. त्यामुळे घर किंवा फ्लॅट किंवा अपार्टमेंट खरेदी करण्याआधी कंमन सुविधा कोण वापरू शकतो, त्यांची देखभाल कोण करणार, खर्च कोण उचलणार आणि इतर सोसायट्यांमधील लोकांनाही त्या वापरता येतील का? अशा सर्व गोष्टींची खातरजमा केली पाहिजे.

कोर्टाने नेमकं काय म्हटले?

कोर्टाने नेमकं काय म्हटले?

कर्नाटक उच्च न्यायालयाने 9 जुलै, 2026 रोजी अपील फेटाळले आणि सांगितले की, नोंदणीकृत Sale Deed नुसार दोन्ही प्रकल्पांमधील रहिवाशांना सामायिक सुविधा वापरण्याची परवानगी होती. म्हणजे, विक्री करारात कॉमन वापराचा हक्क आधीच दिला असतो, तेव्हा फ्लॅट मालक नंतर या सुविधांवर एकतर्फी हक्कांचा दावा करू शकत नाहीत.

गृहनिर्माण प्रकल्पातील कॉमन सुविधा कोणत्या?

गृहनिर्माण प्रकल्पातील कॉमन सुविधा कोणत्या?

गृहनिर्माण प्रकल्पात केवळ क्लबहाऊस किंवा स्विमिंगपूल पुरत्या सामायिक सुविधा मर्यादित नसतात. त्यामध्ये अंतर्गत रस्ते, एन्ट्री-एक्झिट दरवाजे, रस्ते, जिम, गार्डन, मोकळ्या जागा, सिक्युरिटी आणि इतर सोयीसुविधांचाही समावेश असू शकतो. मात्र लक्षात घ्या की प्रत्येक प्रकल्पानुसार सोयीसुविधा आणि वापराचे हक्क वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे घर खरेदी करण्यापूर्वी, ब्रोशरऐवजी विक्री करार आणि इतर कायदेशीर कागदपत्रांमध्ये दिलेला तपशील तपासणे महत्त्वाचे आहे.

एक सोसायटी दुसऱ्या सोसायटीला कॉमन सुविधा वापरण्यापासून रोखू शकते का?

एक सोसायटी दुसऱ्या सोसायटीला कॉमन सुविधा वापरण्यापासून रोखू शकते का?

असं प्रत्येक बाबतीत घडेलच असे नाही. नोंदणीकृत विक्री करार किंवा इतर कायदेशीर कागदपत्रे दुसऱ्या सोसायटीच्या रहिवाशांना कॉमन सुविधा वापरण्याची परवानगी देत असेल तर त्यांना रोखणे सोपे नाही किंवा कायद्याविरुद्ध ठरेल. या कर्नाटकच्या प्रकरणात न्यायालयाने विक्री करारातील अटींना महत्त्वपूर्ण मानले आणि सांगितले की केवळ सोसायटी किंवा रहिवासी संघटना स्थापन केल्याने प्रत्येक सुविधेवर विशेष अधिकार मिळत नाही.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा