Hingoli Police Control Room Police Sub Inspector Amol Gangalwad Ended his Life; दोन महिन्यापूर्वीच हिंगोलीत बदली, PSI अमोल गंगलवाड यांनी वर्दीवरच आयुष्य संपवलं; घटनेचं कारण अद्याप अस्पष्ट
Hingoli Police Control Room Police Sub Inspector Amol Gangalwad Ended his Life; दोन महिन्यापूर्वीच हिंगोलीत बदली, PSI अमोल गंगलवाड यांनी वर्दीवरच आयुष्य संपवलं; घटनेचं कारण अद्याप अस्पष्ट
Hingoli Police Sub Inspector Ends his Life : हिंगोली पोलीस दलातील नियंत्रण कक्षा कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वेसमोर उडी मारत आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पीएसआय अमोल गंगलवाड रेल्वेखाली आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
धनाजी चव्हाण, हिंगोली : येथील खटकाळी बायपास भागात रेल्वेसमोर उडी घेऊन एका पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी रोजी घडली आहे. या दुर्दैवी घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे. अमोल विठ्ठलराव गंगलवाड (वय 40) असं आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. हिंगोलीतील खटकाळी रेल्वे उड्डाणपुलाजवळ आज शनिवारी सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास पूर्णाकडून अकोल्याकडे जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेसमोर उडी घेऊन अमोल गंगलवाड यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी अंगावरील खाकी गणवेशावरच हे टोकाचं पाऊल उचललं.
आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट
रेल्वे कर्मचाऱ्यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवलं. त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर, सहायक पोलीस निरीक्षक दीपक मस्के, पोलीस उपनिरीक्षक संजय मार्के, शेख अजमत आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृत अमोल गंगलवाडहे हिंगोली येथील पोलीस नियंत्रण कक्षात सेवेत असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, त्यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची कारण अद्याप अस्पष्ट आहे.
अमोल गंगलवाड यांची दोन महिन्यांपूर्वीच परभणी पोलीस दलातूनहिंगोली पोलीस दलात बदली झाली होती. अत्यंत मनमिळाऊ आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची ओळख होती. घटनेच्या ठिकाणी पोलिसांना कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही, त्यामुळे या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यानं हे पाऊल का उचललं, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
कंटाळून 19 वर्षीय तरुणीने स्वत:ला संपवलं
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील सावंतपूर येथील अंकुर बबन सुतार या तरुणाच्या एकतर्फी प्रेमाला आणि त्रासाला कंटाळून 19 वर्षीय तरुणीने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना गुरुवारी 27 ऑगस्ट रोजी घडली आहे. मात्र, या घटनेनं पलूस तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अंकुर सुतार व मयत तरुणी हे एकाच गल्लीत समोरासमोर राहत होते. यामुळे अंकुरचे व तरुणीचं एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. याचाच फायदा घेत आरोपी अंकुर हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला. मयत तरुणी ही पलूस येथील शासकीय आयटीआय कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती, तर अंकुर हा कोल्हापूर येथे ज्वेलरीच्या दुकानात कामाला होता. यामुळे तरुणी ही आरोपीला दाद देत नव्हती. त्यामुळे आरोपीने मागील 15 दिवसांपासून मयत युवतीला वारंवार फोन करणे, मेसेज करून, ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुही माझ्यावर प्रेम कर,’ अशा आशयाचे संदेश पाठवणे आणि फोन करून तिच्यावर प्रेमसंबंधासाठी दबाव आणल्याचं असं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा