Headlines

Hingoli mp nagesh ashitkar open challenge after uddhav thackerays supporters showed black flags; ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले, बंडखोर खासदार संतापला


Shivsena News: खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोरच आष्टीकर यांनी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना इशारा दिला.

shivsena
ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले, बंडखोर खासदार संतापला(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नांदेड: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र विरोधाचा सामना करावा लागत आहे. शिवसेनेचे नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यात असलेल्या खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना आज पुन्हा ठाकरे समर्थकांनी काळे झंडे दाखवत ‘गद्दार गद्दार’ अशी घोषणाबाजी केली. ठिकठिकाणी दाखवल्या जाणाऱ्या काळ्या झेंड्यांवर अखेर खासदार आष्टीकरांनी आपली आक्रमक भूमिका मांडली आहे. “कोण किती पाण्यात आहे, हे मला चांगलंच माहिती आहे. येत्या आठ-दहा दिवसांत मी मतदारसंघातील प्रत्येक गावात फिरणार आहे, कोणात हिंमत असेल तर त्यांनी समोर येऊन विरोध करावा,” असं थेट आव्हान खासदार आष्टीकर यांनी विरोधकांना दिलं. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त किनवट तालुक्यातील सारखनी येथे महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं.

“गावाचा विकास आणि लोकांची कामे करणार”

कार्यक्रमात बोलताना खासदार आष्टीकर यांनी पक्ष सोडल्याबाबत आपली भूमिका मांडली. “आठवड्याभरापूर्वी आम्ही सहा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरेंच्या पक्षात असताना निधी मिळत नव्हता, मतदारसंघातील कामे होत नव्हती, सत्तेत जाऊनविकास करता येईल, यासाठी पक्ष बदलला,” असं आष्टीकर म्हणाले. येत्या पाच सहा दिवसानंतर मतदार संघातील प्रत्येक गावात जाणार असून सर्व सामान्य नागरिकांची कामे करणार असल्याचे ते म्हणाले.

खासदाराला काळे झेंडे दाखवणाऱ्या शिवसैनिकांचे उद्धव ठाकरेंकडून कौतुक

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यात असलेले बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. नांदेडहून किनवटकडे ताफा जाताना अंजनखेड गावाजवळ ताफा अडवण्याचाही प्रयत्न केला. काळे झेंडे आणि गद्दार असे फलक दाखवून ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आष्टीकर यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. बंडखोर खासदाराला काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांनी फोन केला. फोनवरून उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांना फोन करून उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. “तुम्ही चांगलं काम करताय, तुमच्या सारखे निष्ठावान शिवसैनिक आहेत तोपर्यंत शिवसेनेला धोका नाही,” असं ठाकरे म्हणाले.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा