Headlines

Hindustani Bhau warns Uddhav Thackeray Shiv Sena UBT MLAs will leave slams Sanjay Raut; भांडुपच्या अनिल कपूरला तोंड बंद करायला सांगा, 7 सप्टेंबरला उबाठाचे 15 आमदार जातील, हिंदुस्थानी भाऊचा ठाकरेंना इशारा


Uddhav Thackeray : भांडुपचा खोटा अनिल कपूर आहे, त्याला आत्ता तरी तोंड बंद करायला सांगा, नाही तर ह्याचा तुडवा ऑपरेशन चालू होईल, अशा शब्दात हिंदुस्थानी भाऊ याने संजय राऊत यांना टोले लगावले.

Hindustani Bhau Sanjay Raut Uddhav Thackeray Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : ‘आमच्या भोळ्याभाबड्या हिंदुत्वाचा गैरफायदा घेऊ नका. तुम्ही आमचे धनुष्यबाण चोरले, पण हनुमानाच्या मशालीने जशी रावणाची लंका जाळली तीच मशाल आज आमच्या हाती असून या मशालीनेच आम्ही अन्यायाची लंका जाळणार’, अशा शब्दांत शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या रविवारी भाजपवर निशाणा साधला. त्यानंतर बिग बॉस फेम हिदुस्थानी भाऊ याने इन्स्टाग्रामवरुन उद्धव ठाकरेंना आपल्या नेत्यांना सांभाळण्याचा इशारा दिला आहे.

हिंदुस्थानी भाऊ काय म्हणतो?

“उद्धव साहेब, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, माहिती आहे ना? मी मध्ये बोललेलो, की सांभाळा नाहीतर पंधरा आमदार आणि पंचवीस नगरसेवक जायच्या मागे आहेत. सचिन भाऊ अहिर पहिला बॉम्ब फुटला आणि सप्टेंबरपर्यंत खूप काही जाणार आहे. सप्टेंबर सात तारीख, आठवण ठेवा ही दिनांक, खूप काही जाणार आहे” असं हिदुस्थानी भाऊ उद्धव ठाकरेंना म्हणाला.
Maharashtra TimesCrime News : मैत्रिणीच्या भावाशी 2 महिन्यापूर्वी लग्न, ऑफिसला पार्टी देऊन घरी निघाली, नवविवाहितेच्या गूढ मृत्यूने हळहळ

संजय राऊतांना टोले

“तुमचा अनिल कपूर काय बोलतो? आता तुडवा ऑपरेशन चालू करणार. तुडवा ऑपरेशन चालू करणार? अरे, सचिन भाऊ अहिर कोण आहे? दगडी चाळचं नाव ऐकलं. ऐकलं ना? सात रस्ता, दगडी चाळ, अरूण भाई गवळी उर्फ डॅडी… बाळासाहेब काय बोलायचे माहिती आहे ना? तुमच्याकडे दाऊद आहे तर आमच्याकडे गवळी आहे. हा तेच ते अरुण भाई गवळी. हा भांडुपचा खोटा अनिल कपूर आहे ना, याला आत्ता तरी तोंड बंद करायला सांगा. नाही तर ह्याचा तुडवा ऑपरेशन चालू होईल हा. जय श्री राम. जय शंभू नारायण.” अशा शब्दात हिंदुस्थानी भाऊ याने संजय राऊत यांना टोले लगावले.

ठाकरे गटाचे रामरक्षा आंदोलन

अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील दान चोरीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रविवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘रामरक्षा आंदोलन’ करण्यात आले. यावेळी दादरच्या हनुमान मंदिरात महाआरती तसेच रामरक्षा स्ताेत्र आणि हनुमान चालिसा, मारुती स्ताेत्र पठणाने राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात झाली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. या आंदोलनाला उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अजय चौधरी, सुधीर साळवी, विशाखा राऊत आदी नेते उपस्थित होते.

Sanjay Jadhav भाजपात जाणार?, चर्चांना लावला फुलस्टॉप, म्हणाले, ‘मी कडवट शिवसैनिक’

‘हिंदू आजही भरडला जात आहे’

‘आपण कट्टर कडवट देशाभिमानी हिंदू आहोत. आम्ही हिंदू भोळे आहोत, भाबडे आहोत पण मूर्ख नाही आहोत, आपल्या हिंदुत्वाचा गैरफायदा घेऊन जर कोणी मंदिर लुटत असेल तर त्यांना अब हिंदू माफ नही करेगा. या देशाची सत्ता घेताना जय श्रीरामच्या घोषणा दिल्या गेल्या, मंदिर वही बनायेंगे सांगितले गेले. तेव्हा शिवसैनिकांनी जेवढे काम केले तेवढे दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले नसेल. शिला पूजन, रथयात्रा आणि अयोध्येत जाऊन कार सेवाही आम्ही केली. मात्र हिंदू आजही भरडला जात आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Maharashtra TimesMumbai Crime : आई फोन का नाही उचलत! लेकीची चिंता वाढली, नातेवाईकांनी पवार कुटुंबाचं दार तोडलं, घरात भयंकर दृश्य, २३ वर्षांचा शेजारी अटक
‘मुंबईने जे भोगले ते क्वचितच एखाद्या शहराने भोगले असेल. बॉम्बस्फोट झाले, दंगली झाल्या, तेव्हा देशातील एकच मर्द शिवेसनाप्रमुख हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदूंच्या पाठीशी उभा राहिला होता. हिंदू भयग्रस्त होता, हिंदू आक्रमित होता, तेव्हा आधार शोधत होता, त्यावेळेला शिवसेनेचा भगवा शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांच्या हातात दिला’, असे ठाकरे म्हणाले.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा