Who is CEO C. Vijayakumar: देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांचे संचालन करणे कठीण काम आहे, पण आर्थिकदृष्ट्या प्रचंड फायदेशीरही आहे. टीसीएस, विप्रो आणि इन्फोसिस यासारख्या मोठ्या कंपन्या कर्मचारी कपात करत असताना HCL टेकने आपले सीईओ, सी. विजयकुमार – सर्वाधिक पगार घेणारे आयटी सीईओ – यांच्या पगारात तब्बल 71% वाढ जाहीर केली आहे.

भारतातील IT कंपनीचे धनवान सीईओ
विजय कुमार यांना टीसीएस आणि इन्फोसिस यांसारख्या बड्या आयटी कंपनयांच्या सीईओंपेक्षाही जास्त पगार मिळत आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात 10.85 दशलक्ष डॉलर्स किंवा अंदाजे 94.6 कोटी रुपये कमावले, जे आयटी क्षेत्रातील सर्वाधिक आहे. इतकेच नाही तर, साल 2026 मध्ये विजयकुमार यांना अंदाजे 176.47 कोटी कोटींचे एकूण पॅकेज मिळाले, ज्यामुळे विजयकुमार यांनी भारतातील सर्वात धनवान आयटी सीईओचा मान कायम ठेवला. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत एचसीएल टेकच्या सीईओंचे वार्षिक पॅकेज अंदाजे 67% जास्त आहे.
Labour Code Rules: 7 तारखेपर्यंत पगार, 2 दिवसांत फुल अँड फायनल; काय आहे नवीन कामगार कायद्याचा नियम?
सी. विजयकुमार कोण?
अनेक वर्षांपासून सी. विजयकुमार HCL टेकमध्ये कार्यरत असून त्यांनी एक अभियंता म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि हळूहळू विविध पदांवर प्रगती केली. 2016 मध्ये एचसीएलटेकचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून सूत्रे हाती घेतली. तेव्हापासून त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने डिजिटल तंत्रज्ञान, क्लाउड, एआय आणि इंजिनिअरिंग या क्षेत्रांमध्ये वेगाने विस्तार केला.
HCL टेकच्या सीईओंच्या पॅकेजमध्ये काय?
विजयकुमारच्या पॅकेजमध्ये केवळ महिन्याचा पगार नव्हे तर बेसिक सॅलरी, परफॉर्मन्स-बेस्ड बोनस, भत्ते आणि स्टॉक-आधारित प्रोत्साहनांचाही मोठा हिस्सा आहे. IT कंपन्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनीत दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी असे स्टॉक-बेस्ड प्रोत्साहन मिळणे सामान्य आहे. अशाप्रकारे, सी.विजयकुमार यांचे वार्षिक पॅकेज 176 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते.
India Oil Imports: अमेरिकेची 100 टक्के टॅरिफची तयारी तरी, भारतीय बंदरांवर रशियन जहाजांची गर्दी! मित्र ठरला संकटमोचक
मागील काही वर्षात एचसीएल टेकने टीसीएस आणि इन्फोसिस यांसारख्या कंपन्यांच्या तुलनेत चांगली कामगिरी बजावली आहे. विजयकुमार यांच्या नेतृत्वात एचसीएलटेकने जगभरातील अनेक देशांमध्ये व्यवसाय विस्तारित केला असून कंपनीने एआय, सायबर सुरक्षा, क्लाउड आणि अभियांत्रिकी सेवांमध्ये लक्षणीय गुंतवणूक केली. सध्या एचसीएलटेक 60 हून अधिक देशांमध्ये सेवा देत असून ग्राहकांची संख्याही लाखांमध्ये आहे.
भारतातील IT कंपन्यांच्या सीईओंचा पगार
भारतातील आघाडीच्या आयटी सेवा कंपन्यांच्या सीईओंपैकी टीसीएसचे सीईओ के. कृथिवासन यांनी आर्थिक वर्ष 2026 मध्ये केवळ 28 कोटींची कमाई केली, जी विजयकुमार यांच्या तुलनेत जवळपास सहा पट कमी आहे. तसेच इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांना, विजयकुमार यांच्या पॅकेजच्या जवळपास निम्मी, 82.6 कोटी रुपये पगार मिळाला असून टेक महिंद्राचे सीईओ मोहित जोशी यांना सुमारे 67.5 कोटी रुपये आणि विप्रोचे श्रीनिवास पल्लिया यांना 49.6 कोटी रुपये तर, LTM चे वेणू लांबू यांनी 27.26 कोटी रुपये पगार घेतला.
| एचसीएल टेक | सी. विजय कुमार | 176.53 कोटी रुपये |
| इन्फोसिस | सलील पारेख | 82.6 कोटी रुपये |
| टेक महिंद्रा | मोहित जोशी | 67.5 कोटी रुपये |
| विप्रो | श्रीनिवास पल्लिया | 49.6 कोटी रुपये |
| टीसीएस | कृतिवासन | 28 कोटी रुपये |

