- Marathi News
- International
- High Alert In Dhaka Ahead Of Hasina’s Press Conference; Awami League Supporters Go Underground In Bangladesh
अमानुर रहमान2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

बांगलादेशात ५ ऑगस्ट २०२४ च्या सत्तापालटाला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या पत्रकार परिषदेवरून राजकारण तापले आहे. भारतात स्व-निर्वासनात राहत असलेल्या शेख हसीना यांनी नवी दिल्लीत बुधवारी लाईव्ह पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, या पत्रकार परिषदेवरून ढाक्यात अलर्ट जारी केला आहे. रहमान सरकारने अवामी लीगच्या कार्यकर्त्यांना एकत्र येऊ न देण्याचे निर्देश दिले आहेत.
अवामी लीगचे समर्थक, नेत्यांमध्ये आशा व भीतीचे वातावरण आहे. पोलिस कारवाईच्या भीतीने ढाकात अनेक कार्यकर्ते भूमिगत झाले आहेत. जुन्या प्रकरणांच्या नावाखाली पोलीस आणि स्थानिक नेत्यांकडून दबाव आणला जात असल्याचे आरोपही होत आहेत. दरम्यान, सत्ताधारी बीएनपीने स्पष्ट केले की हसीना यांचे पुनरागमन कायद्याच्या चौकटीत आणि खटल्यांना सामोरे जाण्यासाठी प्रत्यार्पणाद्वारेच व्हावे. दरम्यान, पंतप्रधान रहमान यांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार हुमायूं कबीर यांनी ढाक्यात भारतीय उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांची भेट घेऊन हसीना यांना पत्रकार परिषद घेण्यापासून रोखण्याची विनंती केली आहे.
पीएम रहमान यांच्या भारत दौऱ्यापूर्वी तणाव वाढण्याची शक्यता भारतात राहून राजकीय संदेश जारी केल्याने ढाका आणि दिल्लीदरम्यान तात्पुरता तणाव निर्माण होऊ शकतो. तारिक रहमान यांचा ब्रिक्स शिखर परिषदेसाठीचा नवी दिल्ली दौरा रद्द होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. मात्र हसीना यांच्या कडक निवेदनानंतर हा दौरा द्विपक्षीय चर्चेऐवजी केवळ औपचारिक कूटनीतिक शिष्टाचारापुरता मर्यादित राहू शकतो.
नवीन कारवाई सुरू होऊ शकते शेख हसीना यांचा ऑडिओ संदेश समर्थकांना आंदोलित करण्यात यशस्वी ठरला, तर बीएनपीप्रणीत सरकार नवीन कारवाई सुरू करू शकते. याउलट, संदेशाचा प्रत्यक्षात मर्यादीत प्रभाव राहिला, तर मोठ्या प्रमाणावर नवीन अटक होण्याची शक्यता कमी राहील.
कडक भूमिका : बीएनपीचा कोणत्याही तडजोडीला नकार सत्ताधारी बीएनपीनुसार, राजकीय तडजोडीतून हसीना यांचे पुनरागमन शक्य नाही. बीएनपीने राष्ट्रीय ऐक्यासाठी राजकीय सलोख्याचा पुरस्कार केला आहे, परंतु त्यासोबतच गेल्या राजवटीतील गुन्ह्यांच्या उत्तरदायित्वाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी अटही ठेवली आहे.
रणनीती : माजी पंतप्रधान स्वतः समर्थकांसमोर का येत नाहीत? हसीना यांनी अलीकडे थेट माध्यमांशी संवाद साधण्याऐवजी ऑडिओ किंवा लेखी निवेदनांचा आधार घेतला आहे. थेट पत्रकार परिषदेदरम्यान अडचणीत आणणाऱ्या अनपेक्षित प्रश्नांपासून वाचण्यासाठी व सुरक्षेच्या कारणास्तव ही पद्धत अवलंबली असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.
दबाव : पोलिस पैसे उकळतात ढाका व नोआखालीसह अनेक जिल्ह्यांत विद्यार्थी अवामी लीग व अवामी लीगचे नेते अटकेपासून वाचण्यासाठी लपून बसले आहेत. आता पोलिस मोहिमांची पद्धत बदलली असून जुन्या प्रकरणांवरून पैसे काढण्याच्या तक्रारी वाढल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
