Headlines

Heavy Rainfall in Ratnagiri Landslide at khed-khopi-dhamanand road


रत्नागिरीत जोरदार पाऊस पडत आहे. जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तसेच मुसळधार पावसामुळे खेड-खोपी-धामणंद मार्गावर मोठे भूस्खलन झाले आहे. तर कासई शिंदेवाडीजवळ दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

ratnagiri news
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. रत्नागिरीतील खेड-खोपी-धामणंद मार्गावरील कासई शिंदेवाडी येथे मोठी दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरड कोसळताना रस्त्याचा काही भागही खचून वाहून गेल्याने या मार्गावरील प्रवास धोकादायक बनला आहे. खेडच्या प्रांताधिकारी वैशाली पाटील या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे, दरड मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र रस्त्याचे मोठे नुकसान झाल्याने वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.

युद्ध पातळीवर दरड हटवण्याचे काम सुरु

घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जेसीबी आणि अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. दरड मोठ्या प्रमाणात कोसळल्यामुळे तसेच रस्त्याचा काही भाग खचल्याने वाहतूक पूर्ववत करण्यासाठी काही काळ लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

प्रवाशांना पर्यायी मार्गांनी जाण्याचे आवाहन

सध्या परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने आणखी भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. खेड-खोपी-धामणंद मार्गावरील प्रवास टाळून शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच संबंधित विभागाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून, रस्ता सुरक्षित झाल्यानंतरच वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

खेडची जगबुडी नदीने इशारा पातळी सोडली

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे जवाहर चौकात शनिवारी सकाळी पाणी आले होते. खेड येथील जगबुडी नदीने शुक्रवारपासूनच इशारा पातळी सोडली वाहत आहे. नदी शनिवारी सायंकाळी उशिरा 5.60 मीटर म्हणजेच धोकादायक पातळीच्या जवळून वाहत आहे. 6 मीटर ही धोकादायक पातळी आहे. तर 5 मीटर ही तिची इशारा पातळी आहे.

खेडच्या नागरिकांना अलर्ट जारी

खेड नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना अलर्ट दिला आहे. खेडच्या नगराध्यक्ष माधवी बुटाला उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, नगरसेवक स्वप्नील सावितवडेकर, मुख्याधिकारी महादेव रोडगे त्यांचे प्रशासन आणि आपत्कालीन मदत पथकाचे प्रसाद गांधी आदी आपत्कालीन पथके या सगळ्या खेड शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. खेड मटण मार्केट येथे पोलीस प्रशासनाकडून बॅरिगेटिंग करण्यात आला आहे.

चिपळूनमध्ये NDRF चे पथक दाखल

दरम्यान, चिपळूण येथे एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. यामध्ये 3 अधिकारी, 23 जवान, 3 चालक यांचा समावेश आहे. चिपळूण शहरातील संभाव्य पूर येणाऱ्या ठिकाणांची या पथकाने पाहणी केली आहे. चिपळूण येथील वाशिष्ठी नदी नियंत्रणात आहे. प्रांताधिकारी आकाश लिगाडे या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा