Headlines

Chhatrapati Sambhajinagar Police Arrest Accused in Mumbai in Samir Shaikh Death Case


छत्रपती संभाजीनगरमध्ये हत्या करून मुंबईत नाव बदलून राहणाऱ्या मुख्य सुत्रधाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या गुन्हे शाखेने मुंबईत वेशांतर करून आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला.

chhatrapati Sambhajingar
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : शहरात भरदिवसा झालेल्या एका गोठवून टाकणाऱ्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अखेर मुंबईतून अटक करण्यात छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. शहरात प्रत्यक्ष हत्येची सुपारी देऊन पोलिसांना गुंगारा देणारा आणि मुंबईत ओळख बदलून राहणारा कुख्यात संशयित आरोपी आसीफ उर्फ रायडर सय्यद हनीब (वय ३३ वर्षे, रा. चेलीपुरा, कांचीवाडा, छ. संभाजीनगर) याला पोलिसांनी अतिशय फिल्मी स्टाईलने पाठलाग करून नागपाडा येथून ताब्यात घेतले. या कारवाईमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीचा खेळ संपला आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी ऑक्टोबर २०२५ मधील आहे. फिर्यादी सना कौसर समीर खान (वय २५ वर्षे, रा. कांचीवाडा, शहाबाजार) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शहाबाजार येथील सिटीझन हॉस्पिटलसमोरील गल्लीमध्ये त्यांचे पती समीर खान हे मोटारसायकलवरून जात होते. त्याचवेळी जुन्या वादातून आसीफ रायडर याने दिलेल्या सुपारीवरून त्याचे साथीदार शोएब काला, इसरार खान, नसीत इता आणि असलम चाऊस यांनी संगनमत करून समीर खान यांना भररस्त्यात गाठले.

आरोपींनी धारदार शस्त्राने आणि तलवारीने समीर यांच्यावर सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी करत जागीच ठार मारले होते. या घटनेनंतर सिटी चौक पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वेशांतर करून पोलीस दोन दिवस नागपाड्यात तळ ठोकून

गुन्हा दाखल झाल्यापासून आसीफ रायडर हा पोलिसांना सतत गुंगारा देत फरार होता. गुन्हे शाखेचे पथक त्याचा तांत्रिक तपास करत असतानाच, तो मुंबईतील नागपाडा येथील छोटा सोनापूर भागात आपले नाव बदलून अत्यंत गुप्तपणे राहत असल्याची खात्रीशीर माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळाली. नागपाडा हा परिसर अत्यंत गजबजलेली वसाहत आणि मोठी व्यापार पेठ असल्याने आरोपीला थेट पकडणे अवघड होते. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाथरकर यांनी आपल्या पथकातील पोलीस अंमलदारांना वेशांतर करून शोध घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पोलीस पथकाने स्थानिक भागात वेशांतर करून दोन दिवस पाळत ठेवली.

पोलिसांना पाहताच दुचाकीवरून पळण्याचा प्रयत्न

दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर संशयित आसीफ रायडर हा नागपाडा पोलीस चौकीजवळून एका मोटारसायकलवर बसून जात असल्याचे पोलिसांच्या नजरेस पडला. वेशांतर केलेल्या पोलीस अंमलदारांनी त्याला घेराव घालण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांची चाणक्य नजर ओळखताच आरोपीने तिथून दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी आरोपीवर घातली झडप

मात्र, सतर्क असलेल्या पोलिसांनी त्याचा थरारक पाठलाग करून त्याला भर बाजारात झडप घालून ताब्यात घेतले आणि छत्रपती संभाजीनगर येथे आणले. गुन्हे शाखेने आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी सिटी चौक पोलिसांच्या हवाली केले असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ही धडक कामगिरी पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त शशिकांत सातव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मजहर सय्यद यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या पथकाने केली.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा