Headlines

चाकणकरांसह आमदार, मंत्री अडकू शकतात, खरात प्रकरणातील सर्वांवर कारवाई करा; भास्कर जाधवांची मागणी – bhaskar jadhav demands that action be taken against other leaders including rupali chakankar who were in contact with ashok kharat



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भोंदू कॅप्टन अशोक खरातच्या कारनाम्यामुळे महाराष्ट्रच नाही तर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रातील अनेक राजकारणी या खरातच्या संपर्कात असल्याने अडचणीत सापडले आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांना हे खरात प्रकरण चांगलंच भोवलंय, मात्र खरातसोबत फोटो, व्हिडिओ असणाऱ्या इतर मंत्री, आमदारांचं काय हा प्रश्न तसाच आहे. या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मोठी प्रतिक्रिया दिलीय. चाकणकर महिला असल्याने त्यांना पुढे करून त्यांच्यावर कारवाया करून आपली पापे लपवण्याचे काम राज्यकर्ते करतायेत, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं. खरात प्रकरणातील सर्वांवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत