Headlines

Harshad Chopda : प्रेमात विश्वासघात, काय करावं सुचेना; लोकप्रिय अभिनेत्यानं सांगितला प्रसंग, म्हणाला, ‘मी स्वतःलाच इजा करून घेतली’


Harshad Chopda : लोकप्रिय अभिनेता हर्षद चोप्रानं ‘लॉक अप’ मध्ये त्याच्या पहिल्या ब्रेकअपबद्दल सांगितलं आहे.

Harshad Chopda On His Breakup
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ‘लॉक अप: ट्रुथ ऑर डेअर’ या रिॲलिटी शोमधील स्पर्धक एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे करत आहेत. शोच्या एका एपिसोडमध्ये, टीव्ही अभिनेता हर्षद चोप्रानं त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एक धक्कादायक किस्सा सांगितला. त्यानं खुलासा केला की, एकदा त्यानं जीव देण्याचा प्रयत्न केला होता.

हर्षद चोप्रानं स्वतःचा हात कापला

शनिवारी तीन स्पर्धक – हर्षद चोप्रा , योगेश रावत आणि सुफी मोतीवाला, एलिमिनेट झाले. स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, हर्षदनं सर्वात आधी बजर दाबला, ज्यानंतर त्याला त्याचं गुपित उघड करावं लागलं.
Maharashtra TimesJennifer Winget : वयाच्या ४१व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात, उद्योगपतीसोबत थाटला संसार
हर्षद म्हणाला, ‘माझ्या पहिल्या रिलेशनशिपमध्ये ती थोडी नाराज होती. तिनं मला फोन करून सांगितलं की, ‘मला या रिलेशनशिपमध्ये राहायचं नाहीये’ आणि मला काहीच कळत नव्हतं. म्हणून, मी माझा हात कापला. त्याच्या खुणा अजूनही माझ्या हातावर आहेत.’
Maharashtra TimesSavita Malpekar : 10 दिवस लेक कोमात, डॉक्टरांनीही आशा सोडलेली; सविता मालपेकर यांनी सांगितला प्रसंग, आलेली स्वामींची प्रचिती
अभिनेता पुढे म्हणाला, ‘पण हो, काहीही झालं नाही. त्यानंतर, मी जागा झालो, घाबरलो आणि स्वतःच हॉस्पिटलमध्ये गेलो. माझ्या पायालाही दुखापत झाली होती, त्यामुळे मी चालूही शकत नव्हतो. कसकसा मी अखेर डॉक्टरकडे पोहोचलो, पण डॉक्टर म्हणाले की मला पोलिसांना कळवावं लागेल. मी त्यांना खूप विनवणी केली. त्यानंतर मी जागा झालो आणि मी स्वतःला वचन दिलं की, मी पुन्हा कधीही स्वतःला त्रास करून घेणार नाही.’

नखरेल मराठी तारकांचा माज असा उतरवतो, Mahesh Tilekar यांची सनसनाटी मुलाखत

हर्षद चोप्राने असंही सांगितलं की, आज तो ज्या घटनेचं वर्णन करत होता, त्याबद्दल त्याच्या वडिलांना आणि कुटुंबातील इतर कोणालाही माहिती नव्हती. यानंतर, हर्षद चोप्रा म्हणाला की, स्वतःचा आदर करणं महत्त्वाचे आहे. त्यानं सांगितलं की, ही घटना मुंबईत येण्यापूर्वी घडली होती आणि त्यावेळी तो २२ किंवा २३ वर्षांचा होता. हे त्याचं पहिलं रिलेशनशिप होतं.
Maharashtra TimesSalman Khan : थकलेले डोळे अन् बारीक शरीरयष्टी; सलमान खानला झालं तरी काय? चाहते चिंतेत, Video व्हायरल

गर्लफ्रेंड आणि जिवलग मित्रानं फसवणूक केली

यापूर्वी, शोच्या प्रीमियर एपिसोडमध्ये हर्षदने सांगितलेलं की, त्यानं एकाच वेळी त्याची गर्लफ्रेंड आणि त्याचा जिवलग मित्र गमावला होता. त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला फसवलं होतं आणि ती त्याच्या जवळच्याच मित्रासोबत रिलेशनशिपमध्ये होती. यानंतर त्याचा लोकांवरील विश्वास उडाला.