Hardeek Joshi Recalled Sister In Law Memories ; Hardeek Joshi : तो रिक्षाने जाईल तुला गरज आहे, दादासाठी घेतलेली बुलेट वहिनीने हार्दिकला दिली; राणादानं सांगितला भावुक किस्सा
Hardeek Joshi Recalled Sister In Law Memories ; Hardeek Joshi : तो रिक्षाने जाईल तुला गरज आहे, दादासाठी घेतलेली बुलेट वहिनीने हार्दिकला दिली; राणादानं सांगितला भावुक किस्सा
Hardeek Joshi On Sister In Law : अभिनेता हार्दिक जोशीच्या वहिनीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. तिचा त्याच्या आयुष्यात मोलाचा वाटा असल्याच्या आठवणी तो नेहमीच सांगतो.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून घराघरात पोहोचलेला राणादा म्हणजे जमिनीचा हार्दिक जोशी याने प्रेक्षकांच्या मनात पक्के स्थान निर्माण केले आहे. त्याने साकारलेल्या प्रत्येक कलाकृती प्रेक्षकांना आवडतात. आज तो एक यशस्वी अभिनेता असला तरीही त्या पाठी त्याच्या वहिनीचा खमका हात होता असे तो बरेचदा वेगवेगळ्या मुलाखतीमध्ये सांगतो.
अभिनेता हार्दिक जोशी याला त्याच्या करिअरमध्ये मोठ्या भावाच्या बायकोची म्हणजेच वहिनीची उत्तम साथ लाभली. स्ट्रगलच्या काळात ती वेळोवेळी त्याला साथ देत होती. एक अभिनेता म्हणून तिनेच त्याच्यावर विश्वास ठेवला त्यामुळे तो आत्मविश्वासाने पुढे काहीतरी करू शकला. मात्र चांगल्याला काहीतरी वाईट नजर लागते तसेच काहीसं हार्दिकच्या आयुष्यात झालं. सर्व सुखा सुखी चालू असताना अचानक त्याची लाडकी वहिनी हे जग सोडून निघून गेली.
Tharala Tar Mag : डोहाळे पुरवताना अर्जुनकडून मोठी गडबड, बाळ अन् सायलीचा जीव धोक्यात; प्रियाच्या सांगण्यावरुन आश्रमात श्वेताची रेकी हार्दिक जोशीने जेव्हा जाऊ बाई गावात हा शो स्वीकारला होता त्यावेळेस त्याची वहिनी आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात होती. ज्या दिवशी या शोचा पहिला प्रोमो आला त्याचवेळी तिचे निधन झाले. हार्दिक तिच्यासाठी तो शो सोडणार होता कारण त्याला तिच्यासोबत शेवटचा वेळ घालवायचा होता पण वहिनीने त्याच्याकडून माझ्यासाठी तर तुझ्या कामावर दुर्लक्ष करणार नाहीस असं वचन घेतलं त्यामुळे त्याने तो शो स्वीकारला. आज वहिनीला जाऊन काही वर्ष झाले तरीही तो बऱ्याच मुलाखतींमध्ये तिच्या आठवणी काढतो.
Shah Rukh Khan Family History : शाहरुखच्या वडिलांशी लग्नापूर्वी आईचा भारतीय क्रिकेटपटूशी झालेला साखरपुडा, पदार्पणातच शतक झळकावत झालेला प्रसिद्ध हार्दिक जोशी याने अशाच एका मुलाखतीमध्ये वहिनीने दिलेल्या पाठिंबाचा एक किस्सा सांगितला. त्यावेळी मी जुनियर आर्टिस्ट म्हणून काम करायचो. भावाने आणि वहिनीने बुलेट घेतली होती. ती बुलेट त्यांनी मला दिली. एकदा मी कुठेतरी ऑडिशनला जाणार होतो तेव्हा तिने मला विचारलं तू कसा जाणार आहेस? तेव्हा मी तिला म्हटलं की पल्सर किंवा एक्टिवा वगैरे घेऊन जाईन. मग ती म्हणाली की नाही…. चांगल्या ठिकाणी जातोयस ना मग बुलेट घेऊन जा. मी म्हटलं मग दादा कशाने जाईल तर म्हणाली की तो जाईल रिक्षाने. या पद्धतीचा आमचं बॉण्डिंग होतं.
माझ्या नवऱ्याची बायकोतील अभिजीतच्या भूमिकेमुळे टोमणे, Sukhada Khandkekar ने उलगडले धमाल किस्से
हार्दिक जोशीने मित्र म्हणे या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, घरात तेव्हाही काही गाड्या वगैरे नव्हत्या. पहिली नवीन गाडीची घेतली ती सुद्धा तीनच घेतली होती. ज्याच्यामध्ये माझा राणाचा स्ट्रगल झाला. रोज मी ६० किलोमीटर लांब जिमला जायचो. ती नवीन गाडी तिला सोडायला असायची. ड्रायव्हर वगैरे होता. तेव्हाही ती म्हणायची तू गाडी घेऊन जा… पण मग दादा म्हणाले की आपण ड्रायव्हर ठेवूया म्हणजे तो ड्रायव्हर तुला सोडेल मग घरी येऊन वहिनीला घेऊन जाईल. तिचा खूप पुढाकार होता. ती मला सतत म्हणायची की तुला नोकरी नाही करायचे ना मग नको करूस… ती खूप खमकी होती. मला असं वाटतं की ती होती कुठेतरी म्हणून मी कलाकार म्हणून उभा राहिलो.
लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.… आणखी वाचा