Guru Purnima Memes Go Viral Netizens Celebrate with Humour | Memes: ‘ChatGPT हाच खरा गुरु!’, गुरुपौर्णिमेवर मजेशीर मीम्स व्हायरल, पाहून हसू आवरणार नाही
Guru Purnima Memes Go Viral Netizens Celebrate with Humour | Memes: ‘ChatGPT हाच खरा गुरु!’, गुरुपौर्णिमेवर मजेशीर मीम्स व्हायरल, पाहून हसू आवरणार नाही
Funny Guru Purnima Memes: संपूर्ण देशात गुरुपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहेत. दरम्यान, काही नेटकरी मीम्सच्या माध्यमातून गुरुपौर्णिमा साजरी करत आहेत.
गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. कारण लहानपणापासून वृद्धत्वापर्यंत आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कोणी मदतीचा हात पुढे करतं, कोणी चांगल्या गोष्टी शिकवतं, कोणी संकटातून बाहेर काढतं, तर कोणी ज्ञान, संस्कार आणि योग्य मार्गदर्शन देतं. अशा सर्व गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. आजच्या दिवशी लोक आपल्या गुरुंचे आशीर्वाद घेतात आणि त्यांच्या शिकवणीचं स्मरण करतात. असो, पण काही अतरंगी नेटकरी असेही आहेत, ज्यांनी मीम्सच्या माध्यमातून गुरुपौर्णिमा साजरी केली आहे. चला तर मग पाहूया व्हायरल होत असलेले काही निवडक आणि मजेशीर मीम्स.
…पण मी पाया पडणार नाही.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
शिक्षक म्हणताहेत, “कोणाला सांगू नकोस, मी तुझा गुरु आहे.”
कॉर्पोरेट जगासाठी ChatGPT हाच खरा गुरु!
या गुरुंनी जे शिकवलं, ते दुसरं कोणीच शिकवू शकणार नाही.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!
पाय असेच जमिनीवर राहू देत.
लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.
डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.
महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.
क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.
शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.… आणखी वाचा