Headlines

gondia govt nursing college 45 female students suffer from food poisoning ; गोंदियात 45 विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा; शासकीय नर्सिंग कॉलेजमधील घटना, प्रकृती स्थिर


Gondia 45 Nursing Students Food Poisoning: विषबाधा झालेल्या विद्यार्थिनींवर शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.

गोंदिया
शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, गोंदिया(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.वृत्तसेवा, गोंदिया: केटीएस जिल्हा रुग्णालयांतर्गतच्या बाई गंगाबाई रुग्णालयाजवळील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या ४५ विद्यार्थिनींना गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास अन्नातून विषबाधा झाली. सध्या, सर्व विद्यार्थिनींना उपचारासाठी स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकूर्ती धोक्याबाहेर आहे.

स्थानिक बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या परिसरातील शासकीय नर्सिंग महाविद्यालयात १८५ प्रशिक्षणार्थी विद्यार्थी नर्सिंगचे प्रशिक्षण घेत आहेत. सर्व विद्यार्थ्यांना कॉलेजच्या कॅन्टीनमधून जेवण आणि नाश्ता दिला जातो. बुधवारी रात्री विद्यार्थी जेवण करून झोपायला गेले. नंतर रात्री दोन-तीन विद्यार्थिनींना पोटात दुखू लागले तसेच उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे त्यांना उपचारासाठी तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास नर्सिंग कॉलेजमधील इतर विद्यार्थ्यांनाही तसाच त्रास जाणवू लागला. त्यामुळे, या सर्व विद्यार्थ्यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.

Maharashtra TimesRishikesh Vaidya : मी महादेवाचा अवतार; पुण्यातील विवाहितेवर लॉजमध्ये अत्याचार, वसईच्या स्वयंघोषित धर्मगुरुवर गुन्हा, खरात केसनंतर महिलेला बळ
नर्सिंग कॉलेजमधील सर्व १८५ विद्यार्थ्यांनी कॅन्टीनमध्ये जेवण केले होते. यापैकी ४५ जणांना संसर्ग झाला. दरम्यान, हे सर्व ४५ विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असून तेथील डॉक्टरांनी त्यांच्या लक्षणांना दुजोरा दिला आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जात आहे. विषबाधे मागील कारण शोधण्यासाठी अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हर यांनी रुग्णालयात जाऊन बाधित विद्यार्थीनींची भेट घेत विचारपूस केली.

Maharashtra TimesCrime News : प्लॉट विक्रीच्या वादातून संसाराची राखरांगोळी, पतीच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली; संतापात नवऱ्याला संपवलं
रामनवमी उत्सवाला जाणाऱ्या भाविकांना उडविले; एक ठार
रामनवमी उत्सवात सहभागी होण्यासाठी पायी वारी करीत निघालेल्या अकोला जिल्ह्यातील तीन भाविक तरुणांवर काळाने घाला घातला. भरधाव मालवाहू पिकअपने चिरडल्याने एक जण ठार झाला; तर दोघे गंभीर जखमी झाले. खामगाव तालुक्यातील संभापूर ते लासुरा फाट्यादरम्यान गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. हर्षल गजानन फाळके (वय १७, रा. वाहळा बुद्रूक, ता. पातूर, जि. अकोला) असे मृत तरुणाचे, तर शंकर अशोक ठाकरे आणि धनंजय शिवनारायण सिरसाठ अशी गंभीर तरुणांची नावे आहेत.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा