Headlines

Gold-Silver Rate Today 10 July 2026; सराफा बाजार पुन्हा धडाम! ग्राहकांच्या चेहऱ्यावर उमटलं समाधान; सोने-चांदीच्या किमती पुन्हा लालेलाल


Gold- Silver Price Today 10 July 2026: तुमच्या घरी लग्नसोहळा किंवा सणासुदीचे कार्यक्रम असतील आणि तुम्ही सोने-चांदी खरेदीचा विचार करत असाल तर तुम्हाला दररोज बदलत्या दरांमध्ये नक्कीच माहिती हवी. शुक्रवार, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी, 10 जुलै रोजी सोने आणि चांदीच्या दरांत किंचित वाढ नोंदवली गेली आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविराम चर्चा विफळ झाल्यामुळे सराफा बाजारावर दबाव निर्माण झाला होता, ज्याचा सुरुवातीला डॉलरला फायदा झाला आणि मौल्यवान धातूंवर मात्र दबाव आला व त्यानंतरही बाजारात अजूनही सावधगिरीचे वातावरण पहिले जात आहे.

Maharashtra TimesRobert Kiyosaki: तुमचे पैसे बुडणार? ‘इतिहासातील सर्वात मोठं मार्केट क्रॅश होणार’; म्युच्युअल फंड, ETF गुंतवणूकदारांना कियोसाकीचा इशारा
जागतिक सराफा बाजारात 10 जुलै रोजी सकाळच्या सुरुवातीच्या सत्रात बुलियन दरांमध्ये किंचित वाढ झाल्याचे दिसून आले. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविराम चर्चा फिस्कटल्यामुळे निर्माण झालेल्या दबावामुळे गुंतवणूकदार सावधगिरी बाळगत असून या चर्चेच्या अपयशामुळे सुरुवातीला डॉलर वधारला आणि मौल्यवान धातूंवर दबाव आला.

अमेरिकन डॉलर आणि अमेरिकन रोख्यांवरील बॉन्ड यील्ड्स कमी झाल्यामुळे सलग तीन सत्रांमधील घसरणीनंतर 10 जुलैच्या व्यवहार सत्रात जागतिक बाजारातील सोन्याच्या दरांवर सुधारणेचा रंग चढला. मात्र, पश्चिम आशियात अमेरिका-इराण यांच्यातील वाढता तणाव व अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून उच्च व्याजदर कायम ठेवले जाण्याची शक्यता वाढली ज्यामुळे पिवळसर धातूच्या भविष्यातील वाटचालीवर अजूनही दबाव कायम आहे.

Maharashtra TimesNew EPF Scheme 2026: EPF विड्रॉलचे नवीन नियम; नोकरी सोडल्यानंतर 12 महिने वाट बघावी लागणार; कधी आणि किती वेळा पैसे काढता येणार?

सोने-चांदीचा आजचा दर काय

सकाळी 9.15 वाजता भारतातील वायदा बाजार, MCX वर, दोन्ही मौल्यवान धातूंचे दर किंचित घसरणीच्या व्यवहार करत आहेत. सोन्याचा वायदा 487 रुपयांनी किंवा 0.34% घसरून 1,44,813 रुपये प्रति ग्रॅमवर सपाट व्यवहार करत आहे तर चांदीची किंमत सुमारे अडीचशे रुपयांनी कमी होऊन 2,26,130 रुपये किलोवर पोहोचली.

त्याचप्रमाणे, सराफा बाजारात 24 सोन्याचा 10 ग्रॅम दर 1.49 लाख रुपयांवर पोहोचला तर, चांदीसुद्धा महाग झाली आणि अंदाजे 2.35 लाख रुपये किलोवर उसळी घेतली. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत, त्यामुळे गुंतवणूक किंवा दागिने खरेदी करण्याआधी लोकांनी दररोज बदलत्या दारांबद्दल माहिती घेणे आवश्यक आहे. जागतिक संकेत आणि देशांतर्गत मागणीचा प्रभाव सोन्या-चांदीच्या किमतींवर दिसून येत असल्याचे बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Maharashtra TimesSBI Funds IPO: गुंतवणूकदार सज्ज व्हा! पुढील आठवड्यात येणार देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडाचा मेगा आयपीओ; पाहा डिटेल्स
याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने या वर्षाच्या उत्तरार्धात व्याजदरात कपात करण्याच्या अपेक्षांना बळकटी दिली त्यांनतर, सोन्या आणि चांदीच्या दरांवरील दबाव वाढला. 10 जुलै रोजी Comex वर स्पॉट सोन्याचा भाव 0.47% घसरणीसह 4,12.4 डॉलर्सच्या आसपास राहिला तर, चांदीचा भाव 0.82% घसरून 60.25 डॉलर्सवर व्यवहार करत होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये सुधारणा झाली तरीही डॉलरची हालचाल आणि गुंतवणूकदारांच्या वाढत्या खरेदी या घटकांमुळे देशांतर्गत बाजारातील सोन्या आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार दिसून येत आहेत.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत