Headlines

Gold Silver Rate 12 August 202सोन्याचा पारा चढला! पिवळसर धातूचा भाव वधारलेलाच, चांदीच्या किमतीही आवाक्याबाहेर; ही तेजी टिकणार का?


Gold Silver News Today: देशभरातील सोने आणि चांदीच्या किंमत रंगात आले आहेत. सणासुदीच्या काळात तुम्ही सराफा बाजारावर लक्ष ठेवून असाल, तर तुमच्या लक्षात आले असेल की मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ होत आहे. जागतिक अनिश्चितता आणि आंतरराष्ट्रीय सराफा बाजारातील सकारात्मक संकेतांचा मागोवा घेत सोन्याच्या दरांनी 10 आठवड्याच्या उच्चांकावर उसळी घेतली आहे. MCX आणि रिटेल मार्केटमध्येही सोने आणि चांदी नवनवीन विक्रम करत आहेत.

सोन्याचा भाव 19000 रुपये 10 ग्रॅमनी वाढला

2026 च्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात 19000 रुपये प्रति 10 ग्रॅमपेक्षा जास्त वाढ झाली आहे. आदल्या दिवशी IBJA वर 999 शुद्धतेचे 24 कॅरेट सोने 1,50,641 रुपयांवर बंद झाले तर, 12 ऑगस्टच्या सकाळी 24 कॅरेट सोन्याचा सरासरी दर 1,53,830 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22-कॅरेट सोने 1,41,010 रुपये आणि 18 कॅरेट सोने 1,15,380 रुपयांना मिळत आहे.

Maharashtra TimesGold Price Today: सोन्याचा पारा चढला! पिवळसर धातूचा भाव वधारलेलाच, चांदीच्या किमतीही आवाक्याबाहेर; ही तेजी टिकणार का?त्याचवेळी, देशांतर्गत वायदा बाजार MCX वर बुधवारी सकाळी 9.25 वाजता सोन्याच्या किमती 1,54,644 रुपये आणि चांदीचे फ्युचर्स 2,37,427 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहेत.

सोने-चांदीच्या दरांमध्ये तेजीचे कारण काय?

एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सतत चढ-उतार होत आहे तर, अजूनही पश्चिम आशियातील युद्धाचा तोडगा निघालेला नाही तरीही सोन्याच्या दरात सलग आठवड्या दिवशी खरेदी होताना दिसत आहे. सध्या कमोडिटी बाजाराचा दृष्टिकोन मजबूत आणि सकारात्मक दिसत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे असून या तेजीमागे खालील प्रमुख कारणे आहेत:

Maharashtra TimesPO Investment Scheme: फक्त व्याजातून 5 लाखांची कमाई; पोस्टाची टेन्शन फ्री रिटायरमेंट योजना! एकाच गुंतवणुकीत मिळेल जबरदस्त रिटर्न1. मध्यवर्ती बँकांची प्रचंड खरेदी

जगभरातील मध्यवर्ती बँका, विशेषतः चीन आणि पोलंड, आपला राखीव निधी वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत.

Maharashtra Timesप्लास्टिकच्या नोटांना अखेर मंजुरी, ३० वर्षांपर्यंत काहीच होणार नाही! बाजारात कधीपासून येणार? सर्व समजून घ्या2. अमेरिकन डॉलरचे अवमूल्यन

अमेरिकेतील रोजगाराची आकडेवारी अपेक्षेपेक्षा कमजोर राहिली, ज्यामुळे व्याज दरवाढीची भीती कमी झाली. याचा सोने आणि चांदीच्या किमतींना थेट फायदा होत असून अजून मजबूत होत आहेत.

जागतिक मध्यवर्ती बँकांकडून सतत वाढणारी सोन्याची मागणी आणि डॉलरच्या घसरणीमुळे येत्या काही दिवसांत सोने-चांदीचे भाव मजबूत राहू शकतात. त्यामुळे, श्रावणच्या पवित्र महिन्यात किंवा सणासुदीनिमित्त सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बाजारातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवा.