Headlines

Gold Silver Price Today MCX 14 August 2026; श्रावणच्या सुरुवातीसह सोन्याच्या भावात मोठा बदल, चांदीच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी घसरण; पाहा आजचा रेट


Gold Price News: तुमच्या घरात लगीनघाई आहे आणि सोने खरेदी करण्याचा विचार करत आहात का? किंवा दर महिन्याला सोन्यामध्ये थोडी रक्कम गुंतवता का? असं असेल तर 14 ऑगस्टच्या सकाळी सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीने तुमचे लक्ष नक्कीच वेधून घेईल. अमेरिकेतील महागाईची आकडेवारी अपेक्षेपेक्षा कमी आली असली तरीही गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्यामुळे 14 ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात बुलियन किमतीत घसरण झाली. सलग दुसऱ्या दिवशी देश-विदेशातील बाजारात सोने-चांदीच्या दरांमध्ये नरमाई दिसून आली आहे.

सोने-चांदीचा आजचा दर काय?

अनुक्रमे दीड लाख रुपये आणि अडीच लाखांवर नव्याने उसळी घेतलेल्या सोन्याच्या दरांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी नफावसुली होताना दिसत आहे. 14 ऑगस्ट 2026 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवसआधी आणि श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी सोने-चांदीच्या किमतीत घसरगुंडी सुरूच राहिली आहे. या घसरणीमुळे खरेदीदारांना संधी मिळाली असून अलीकडील तेजीनंतर गुंतवणूकदार नफा कमावत आहेत, ज्याचा परिणाम आता कमोडिटी बाजारावर दिसून येत आहे.

Maharashtra TimesEPF Pension Calculator: 15 वर्षे प्रायव्हेट नोकरी, 10,000 ते 15000 सॅलरीवर इतकी मिळेल पेन्शन, या फॉर्म्यूल्याने करा कॅलक्युलेट
गुड्सरिटर्न्सच्या माहितीनुसार, भारतात आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,53,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तसेच देशांतर्गत कमोडिटी बाजारात MCX वर शुक्रवारी सकाळी सोन्याच्या फ्युचर्स किमती 0.68% घसरणीसह 1.52 लाखांवर घसरल्या आहेत तर, चांदीचा वायदा भाव 0.71% कमी होऊन 2.33 लाख रुपयांवर खाली आला आहे.

अशा परिस्थितीत, प्रश्न उपस्थित होतो की गेल्या काही दिवसांपासून तेजीची उभारी घेणाऱ्या सोन्या-चांदीच्या किमती अचानक स्वस्त का होत आहेत? सोने-चांदीत पुढील मोठी घसरण सुरू झाली आहे का? तुम्हाला दागिने खरेदी करायचे असतील किंवा गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही काय केलं पाहिजे.

Maharashtra Times8th Pay Commission लागू व्हायला 2027 पर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार; केव्हा वाढीव पगार मिळणार? सरकारने संसदेत दिली माहिती

सोने-चांदीच्या दरवाढीची कारणे

सोन्यातील घसरण सातासमुद्रापारहून आंतरराष्ट्रीय बाजारातून सुरू झाली. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात तेजीचा कल पाहायला मिळत होता आणि ऑगस्ट महिन्यात आंतरराष्ट्रीय सोन्याच्या दरात जवळपास 10% वाढ झालेली, ज्यामागे अनेक घटक कारणीभूत होते. यामध्ये कमकुवत डॉलर, अमेरिकेच्या व्याजदरांविषयी बदलत्या अपेक्षा, जागतिक तणाव आणि मध्यवर्ती बँकांची खरेदी यांचा समावेश होता.

सोन्या-चांदीच्या किंमतीत अचानक घसरण का?

प्रॉफिट बुकिंग सोन्याच्या अलीकडच्या घसरणीला कारणीभूत आहे. सुमारे एका आठवड्यात सोन्याची किंमत जवळपास 9% वधारली आणि त्यानंतर, मोठ्या गुंतवणूकदारांनी नफावसुली सुरु केली. म्हणजे विक्री वाढल्यामुळे सोन्याची किंमत घसरली. दुसरे प्रमुख कारण 4500 डॉलरची पातळी, ज्याला बाजाराच्या भाषेत रेझिस्टन्स म्हणता येईल. सोन्याची किंमत 4,449 डॉलरवर पोहोचल्यावर गुंतवणूकदारांनी नफा काढून घेणे योग्य ठरवले. त्यामुळे तज्ञ 4500 डॉलरच्या जवळपास सावधगिरी आणि नफा-वसुलीमुळे सोन्याची किंमत खाली आली.

Maharashtra TimesN Chandrasekaran Successor: टाटा समूहात नव्या ‘चंद्रा’चा शोध, उत्तराधिकारीबाबत चिंता; टाटा सन्सच्या नवीन बॉसच्या शर्यतीत कोण-कोण?अमेरिकेतील महागाई कमी झाली, मग सोन्याची किंमत का घसरली?

हा सर्वात रंजक प्रश्न आहे. अमेरिकेतील महागाईची आकडेवारी फारशी वाईट नव्हती. जुलैमध्ये वार्षिक ग्राहक महागाई 3.4% होती तर सप्टेंबरमध्ये फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीची बाजाराची अपेक्षा अंदाजे 40% वरून 35% पर्यंत कमी झाली. सामान्यतः, व्याजदर वाढीची कमी झालेली अपेक्षा सोन्यासाठी चांगली बातमी मानली जाते.