Headlines

Gold Silver Price Today 30 July 2026; फेडच्या निर्णयानंतर सोने-चांदीच्या दरात मोठी हालचाल; सोन्याला झळाळी; चांदीत मात्र नरमाई, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर


Today’s Gold and Silver Rates on MCX 30 July Update:अमेरिका आणि इराण यांच्यातील सततच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या दरात चढउतार होत आहे. MCX वरील ऑगस्ट सोन्याच्या वायद्यांमध्ये अंदाजे 0.17% वाढ दिसून आली तर चांदीच्या फ्युचर्स किमतीत घट नोंदवली गेली आहे. त्यामुळे, आजच्या दिवशी सराफा बाजारात जाण्याआधी सोने-चांदीचे दर नक्की तपासून घ्या.

Gold and Silver Rate Today 30 July 2026
सोने-चांदीचा आजचा दर काय?(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Gold Silver Price Today : पश्चिम आशियात अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये वर-खाली सुरूच आहे. 29 जानेवारी 2026 पर्यंत उच्चांकी झेप घेणाऱ्या सोन्या-चांदीच्य दरात घसरणीचा कल सुरू असून त्यात 29 जुलै रोजी रात्री अमेरिकेतील एका महत्त्वाच्या बैठकीनंतर सोन्याच्या किमतीत पुन्हा बदल झाला आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीनंतर जागतिक बाजारात सोन्याच्या किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत.

सोन्या-चांदीच्या किमतीत संमिश्र व्यवहार

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर स्थिर ठेवण्याच्या निर्णयानंतर सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये हालचाल दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारात कॉमेक्सवर सोन्याच्या किमतीत वाढ झाली, तर चांदीच्या किमतीत घट झाली.सोन्याच्या किमतीत 0.64% वाढ झाली आणि $4062.50 वर दर कमी झाले तर, चांदीच्या किमतीत घसरण दिसून आली असून 0.24% कमी होऊन $57.950 वर व्यवहार करत आहेत.

Maharashtra TimesITR Filing Deadline : उरले शेवटचे 2 दिवस! घाईघाईत सबमिट बटण दाबण्यापूर्वी नक्की तपासा या 4 गोष्टी, अन्यथा राखडेल रिटर्न
त्याचवेळी, देशांतर्गत फ्युचर्स बाजारात MCX वर सोन्याचा वायदा 0.25 टक्के वाढून 1.43 लाखांच्या आसपास व्यवहार करत असताना चांदीच्या फ्युचर्स किमतीत घट नोंदवली गेली आणि 0.36 टक्के घसरून 2.16 लाख रुपयांवर व्यवहार करत आहेत.

अमेरिकेत व्याजदर स्थिर

अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्ह – ने पुन्हा व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. फेडने आपला बेंचमार्क व्याजदर 3.50% ते 3.75% मर्यादेत कायम ठेवला असून यामुळे फेडचे नवे अध्यक्ष केविन वॉर्श यांच्यासमोर महागाई 2% लक्ष्यात आणण्याचे आव्हान आणखी वाढले आणि या हालचालींच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा वाढ दिसून आली.

Maharashtra Timesघरभाड्यावर TAX सूट हवी असेल तर ही 4 कागदपत्रे जपून ठेवा! बनावट Rent Receipt देणारे आयकर विभागाच्या रडारवर
अशा परिस्थितीत, आता गुंतवणूकदार आता अमेरिकेच्या चलनविषयक धोरणाची पुढील चाल समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि गुंतवणूकदार आता पुढील चलनविषयक धोरणाच्या निर्णयाबाबत आपल्या अपेक्षा जुळवून घेत असून गुरुवारी जाहीर होणाऱ्या अमेरिकेच्या चलनवाढीच्या आकडेवारीवर लक्ष लागले असेल.

Maharashtra TimesRussia Sanctions: रशियन तेलावर अमेरिकेचा डोळा, भारत पुन्हा निशाण्यावर; 100% टॅरिफची लटकती मोठी तलवार, विधेयकाला ग्रीन सिग्नल

सेप्टेंबरमध्येही व्याजदर वाढीची अपेक्षा कमीच

अलीकडील बैठकीत फेडरल रिझर्व्हने प्रमुख व्याजदर स्थिर ठेवला आणि फेडचे प्रमुख केविन वॉर्श यांनी महागाई नियंत्रणात ठेवण्याबाबत विधानाने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले, पण पुढील चलनविषयक धोरणाबद्दल कोणताही स्पष्ट संकेत दिले नाही. अशा परिस्थितीत, फेडच्या निर्णयानंतर व्यापाऱ्यांनी सप्टेंबरमधील व्याजदर वाढीची आपली अपेक्षा कमी केली असून फेडवॉचनुसार बाजारात आता सप्टेंबरमध्ये व्याजदर वाढीची 57% शक्यता दिसत आहे, जी फेडच्या निवेदनापूर्वी सुमारे 81% होती.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा