Headlines

Gold Silver Price Today 17 July 2026; अमेरिका-इराण संघर्षात सोन्या-चांदीचा बॅण्ड वाजला; गुंतवणूकदारांचं नुकसान, खरेदीदारांची चांदी; आजचा नवीन भाव काय?


Gold and Silver Rate Drop 17 July 2026 Update: आजचा दिवशी तुम्ही तुमच्या शहरातील सराफा बाजारात जाऊन सोने किंवा चांदी खरेदीचा प्लॅन करत असाल तर, त्याआधी तुम्हाला बदलत्या दरांविषयी माहिती असली पाहिजे. 17 जुलै रोजी, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी, सराफा बाजार तसेच MCX वरील वायदा किमतींमध्येही उलटफेर दिसून आला आहे.

Gold and Silver Price Today 17 July 2026 Update
सोने-चांदीचा आजचा दर काय
Gold Silver Rate Today: जागतिक स्तरावरील कमजोर संकेत, वाढत्या महागाईबद्दल चिंता आणि अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीची शक्यता यांमुळे सोने आणि चांदीच्या दरांमध्ये चढ-उतार दिसून येत आहेत. त्याचवेळी, इराणच्या ठिकाणांवर अमेरिकेने पुन्हा क्षेपणास्त्र हल्ले केल्याने भू-राजकीय तणाव वाढला ज्यामुळे शुक्रवारी, 17 जुलै रोजी, MCX वर सोन्याच्या दरात वाढ झाली.

सोने आणि चांदीचा आजचा दर काय

कमजोर जागतिक संकेत आणि स्पॉट मार्केटमधील मंद मागणीमुळे, शुक्रवारी 17 जुलै रोजी MCX वर सोने आणि चांदीच्या दरांमध्ये चढ-उतार दिसून आले असून दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत संमिश्र ट्रेड होताना दिसत आहे. सकाळी 9:20 च्या सुमारास MCX वरील ऑगस्ट सोन्याचे फ्युचर्स 0.22% वाढीसह 1,40,658 रुपयांवर व्यवहार करत होते तर, सप्टेंबर चांदीचे फ्युचर्स 2.15,925 रुपये किलोवर सपाट राहिले. अशाप्रक्रारे, सोन्याची किंमत जूनच्या सुरुवातीनंतर सर्वात मोठ्या साप्ताहिक घसरणीच्या वाटेवर आहे.

Maharashtra TimesShare Market मध्ये गेम फिरला! खरंच, AI चा फुगा फुटला? 2026 मध्ये 5 बड्या ‘क्रॅश’मुळे करोडो गुंतवणूकदारांच्या जीवाला घोर

सोन्या-चांदीच्या दरात कधी तेजी, तर कधी मंदी

आदल्या दिवशी, MCX वर सोन्याच्या फ्युचर्समध्ये 1% घट झाली, तर चांदीचे सप्टेंबर फ्युचर्स 2% घसरणीसह क्लोज झालेले. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव सध्या सोने-चांदीच्या बाजारासाठी मोठे आव्हान ठरत आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे क्रूडच्या किमती वाढल्या, ज्यामुळे महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली. परिणामी अमेरिकेचे फेडरल रिझर्व्ह नजीकच्या काळात व्याजदर वाढवण्याची शक्यताही बळावली आहे.

भू-राजकीय आघाडीवर अमेरिकेने शुक्रवारी पहाटे इराणवरील हवाई हल्ल्याची व्याप्ती वाढवली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी इराणविरुद्ध हल्ल्यांमध्ये वॉशिंग्टनचा विजय झाल्याचा पुनरुच्चार केला.

Maharashtra TimesMutual Fund Investment: तुमचीही SIP तोट्यात? म्युच्युअल फंडात ‘Stay’ वा ‘Switch’ करण्याचा फॉर्म्युला प्रत्येक गुंतवणूकदाराला माहिती पाहिजे

सोन्याचे दर वाढण्याचे कारण काय?

शुक्रवार, आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी, अमेरिकन डॉलरमधील घसरण आणि CPI महागाईची आकडेवारी अपेक्षेपेक्षा सौम्य राहिल्यामुळे 15 जुलै 2026 रोजी देशांतर्गत बाजारात सोन्याची चमक वाढली. MCX वर सोन्याचा वायदा किंचित वाढीसह व्यवहार करत असताना सलग दोन दिवस दर कमी झाल्यानंतर सोन्याच्या किमतीत वाढीचा कल दिसून आला. यादरम्यान 24 कॅरेट सोन्याचा दर 1,43,280 रुपये 10 ग्रॅम तर, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,31,340 रुपये झाली आहे.