सोने-चांदीच्या किमतीत चढउतार कायम
20 जुलैपासून सुरू झालेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या बाजारात प्रचंड अस्थिरता दिसून आली. आठवड्याच्या सुरुवातीच्या तीन दिवसांत दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींनी तेजीची उभारी घेतली तर, नंतर पुन्हा भाव घसरगुंडीला आले.
8th Pay Commission: 18000 हजारांची बेसिक सॅलरी होणार 69000 रुपये? लवकरच होणार मोठा निर्णय; कधी येणार रिपोर्ट? जाणून घ्या टाइमलाइन
अशाप्रकारे, देशांतर्गत वायदा बाजार MCX वर सोन्याचे फ्युचर्स सहा दिवसांत 1,417 रुपयांनी वाढून 1,43,600 रुपयांवर वधारले असताना चांदीचा वायदा दर 2,719 रुपयांनी वाढून 2,22,301 रुपये झाला आहे. त्याचवेळी, GoodReturns नुसार 25 जुलै रोजी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,44,320 रुपये तर, 22 कॅरेट सोने 1,32,290 रुपये आणि 18 कॅरेट सोने 1,08,240 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच चांदीचा भाव 2,34,900 रुपये किलो झाला आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला उच्चांकी झेप घेतल्यावर गेल्या काही महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरांमध्ये माफक वाढ दिसून येताना किमतींमधील माफक रिकव्हरीमुळे अनेक सोने आणि चांदीच्या गुंतवणूकदारांच्या पुन्हा पल्लवित झाल्या. पण, कोणत्या घटकांनी या मौल्यवान धातूंच्या किमती वाढवल्या आणि ही सुधारणा आणखी काही काळ टिकू शकेल का? हा सध्या बाजारातील सर्वात मोठा प्रश्न आहे.
Pakistan Cash Crunch Crisis: इराणसोबत चर्चा घडवून दिली आता 96000 कोटी द्या! पाकिस्तानने अमेरिकेसमोर पुन्हा हात पसरवले
बॉण्ड यील्डचा सोने-चांदीवर दबाव
दुसरीकडे, अमेरिकन गोल्ड एक्सचेंजचे बाजार विश्लेषक जिम वायकॉफ म्हणाले की, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे बॉण्ड यील्ड तेजीच्या लाटेवर स्वार झाले आहेत. यामुळे सततच्या चलनवाढीच्या दबावामुळे मध्यवर्ती बँका व्याजदर कमी करण्याची शक्यता कमी असल्याची धारणा निर्माण होत आहे. बॉण्ड यील्डमधील तेजी सोने-चांदीच्या बाजारासाठी नकारात्मक घटक मानली जाते, या दोन धातूंवर कोणतेही व्याज मिळत नाही.
सोने-चांदीच्या गुंतवणूकदारांनी काय करायचे?
एखाद्याने दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली असेल तर, अलीकडच्या किमतीतील करेक्शननंतर घाईघाईने किंवा पॅनिक सेलिंग ही योग्य रणनीती नाही. तसेच नव्या गुंतवणूकदारांनी गेल्या काही दिवसांतील रिबाउंडच्या मागे न धावण्याचा तज्ज्ञ सल्ला देत आहेत, विशेषतः अशा वेळी जेव्हा भू-राजकीय तणाव पुन्हा वाढला आणि क्रूडच्या किमती पुन्हा 100 डॉलर्सवर उसळल्या, ज्यामुळे बाजारातील अस्थिरता उच्च पातळीवर राहिली आहे.
याशिवाय बुलियन किमतींच्या पुढील वाटचालीबाबत बाजारातील सहभागी आता मध्य पूर्वेतील घडामोडी आणि फेडरल रिझर्व्हची आगामी बैठक यांकडे बारकाईने लक्ष ठेवतील.
