Gold Silver Price Today Weekly Update: कमजोर अमेरिकी डॉलर आणि जागतिक बाजारातील मजबूत ट्रेंडचा मागोवा घेऊन सोने आणि चांदी दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमती तेजीच्या रुळावर सुस्साट सुटल्या आहेत. आदल्या दिवशी दिल्ली सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींनी तीन महिन्यांहून अधिक काळातील उच्चांक गाठला असून आ रक्षाबंधनापूर्वी सोने-चांदीत तेजीचा कल पाहायला मिळत आहे.

अमेरिकेच्या ट्रेझरीने दीर्घकालीन सिक्युरिटीज बायबॅक करण्याच्या निर्णयामुळे बॉण्ड यील्ड्स घसरले आणि डॉलर कमजोर झाला. यामुळे सोन्याच्या किमतींना चालना मिळाली. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेन्ट यांनी म्हटले आहे की, ट्रेझरीच्या सरकारी पुनर्खरेदीत आणखी वाढ करू शकतात.
सोन्या-चांदीच्या दरांत वादळी तेजी
आदल्या दिवशी एकाच दिवसांत सोने-चांदीच्या दरांनी 3000 रुपयांची वाढ नोंदवली असून आता सोन्याचा दर 1.62 लाख रुपये झाला आहे तर चांदीची किंमतही MCX वर 2.46 लाख रुपयांवर पोहोचली आहे. अशा स्थितीत, आता गुंतवणुकीची योग्य वेळ आली आहे का? याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे. त्याचवेळी, मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव1,47,100 रुपये 10 ग्रॅम तर, 24 कॅरेट सोने 1,60,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
सोने-चांदीच्या किमतींचा विक्रमी उच्चांक
यावर्षी जानेवारी महिन्यात सोन्याच्या किंमती उच्चांकी एव्हरेटवर पोहोचल्या होत्या, पण 1.80 लाख रुपये 10 ग्रॅमवर पोहोचल्यानंतर सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. तसेच सोन्यापाठोपाठ 4.25 लाख रुपये किलोवर पोहोचल्यानंतर चांदीच्या किमतीतही मोठा आपटी बॉम्ब फुटला, तर 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका-इराण संघर्ष सुरू झाल्यानंतर सराफा किमतींवर दबाव आला.
Success Story : 10 किलो पनीर ते 10,000 कोटींचं साम्राज्य! वयाच्या 16 व्या वर्षी सुरुवात; Amul ला टक्कर देत कशी उभारली Milky Mist?दुसरीकडे, डॉलर निर्देशांकातील कमजोरी आणि अमेरिकी बॉण्ड उत्पन्नातील घसरणीमुळे सोने-चांदीच्या दरांमध्ये वाढ झाली, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत, अमेरिकन डॉलर घसरल्यामुळे इतर चलनांमध्ये सोने खरेदी करणे स्वस्त झाले, पण कच्च्या तेलाच्या किमती 93 डॉलर बॅरलपेक्षा जास्त राहिल्याने महागाई वाढल्याचा धोका वाढला असून महागाईला आळा घालण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक व्याजदर वाढवू शकते, ज्याचा सोन्याच्या किमतींवर नकारात्मक परिणाम होईल.
अमेरिकी डॉलर अन् सोन्यातील कनेक्शन
अमेरिकन डॉलरमधील घसरणीमुळे सोन्यालाही आधार मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची खरेदी-विक्री डॉलरमध्ये होते, त्यामुळे डॉलर कमजोर झाल्यावर युरो, पाउंड किंवा इतर चलनांमध्ये व्यवहार करणाऱ्या खरेदीदारांना तुलनेने सोने स्वस्त झाले परिणामी, मागणी वाढू शकते.
अमेरिकी अर्थव्यवस्थेवरील 40 ट्रिलियन डॉलरहून अधिक कर्ज, वाढते व्याजदर आणि अर्थसंकल्पीय तूट या घटकांमुळे सोन्याला आधार मिळत आहे, त्यामुळे गुंतवणूकदार सोन्याला पैसे वाचवणारी मालमत्ता म्हणून पाहतात. दुसरीकडे, पश्चिम आशियातील इराणशी संबंधित अनिश्चितता आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती हेही घटक महत्त्वाचे असून मध्यपूर्वेतील तणावामुळे सुरक्षित गुंतवणुकीची खरेदी वाढते आणि तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे महागाईची भीती वाढते. मात्र, महागाईमुळे अमेरिकेतील व्याजदर वाढल्यास यामुळे सोन्यावर दबाव येऊ शकतो.
सोने-चांदीत गुंतवणुकीची ही योग्य वेळ आहे का?
देशांतर्गत सोन्या-चांदीच्या किमतींवर देशांतर्गत घटकांचा तसेच जागतिक घटकांचा प्रभाव पडतो, त्यामुळे कोणत्याही गुंतवणुकीचा निर्णय घेण्याआधी बाजारातील घडामोडींकडे लक्ष ठेवून असले पाहिजे.
त्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदार प्रत्येक संधीचा फायदा घेण्याची संधी सोडत नाही. पण, सध्याच्या महागड्या दरांवर एकरकमी खरेदी करणे टाळणेच उत्तम ठरेल असे तज्ज्ञ म्हणतात. दुसरीकडे, आधीपासूनच SIP द्वारे गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदारांना SIP सुरू ठेवण्याचा सल्ला दिला जात असून जोपर्यंत कच्च्या तेलाच्या किमती खाली येत नाही, तोपर्यंत सोन्याच्या किंमतीत दरवाढीचा कल कायम राहू शकतो. मात्र, सध्याच्या महाग किंमतीवरून फारशी मोठी घसरण होण्याची शक्यता नाही, त्यामुळे नवीन गुंतवणूकदार कमी रकमेत गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक सुरू करू शकतात.

