Headlines

Gold Rate Hike July 2026; सोने-चांदीच्या दरांत एकदम U-turn! अमेरिकेतल्या एका व्यक्तीने सगळा गेम फिरवला; ग्राहकांना पुन्हा झटका, आता पुढे काय?


Gold Price Hike July 2026: बघताच बघता घसरत्या सोन्याच्या किमतींनी जोरदार उभारी घेतली. ज्या सोन्याचा दर काही दिवसांपूर्वी 4000 डॉलर्स किंवा 1.40 लाखांवरून घसरणपंथीला आला होता, तेच सोने 4,200 डॉलरच्या वर उसळले आहे. अशा परिस्थितीत, बाजारात प्रश्न घुमू लागला आहे की असं का होत आहे? असं का झालं ज्यामुळे सोन्याच्या हालचालीत रातोरात बदल झाला.

Gold Price Rally Reason Explained
सोने-चांदीच्या दरांत एकदम U-turn! अमेरिकेतल्या एका व्यक्तीने सगळा गेम फिरवला(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Gold Prices: गेल्या चार महिन्यांपासून सोन्याची किंमत घसरणपंथीला आलेली. देशांतर्गत फ्युचर्स बाजार, MCX वर, सोन्याचा दर 52000 रुपयांपर्यंत कमी झालेला. पण, आता सोन्याच्या किमतींनी अचानक यु-टर्न घेतला आणि सोन्यापाठोपाठ चांदीचा भावही चढू लागला आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष केविन वॉर्श यांच्या विधानानंतर सराफा बाजारात अचानक उलटफेर झाले आहेत.

सोने-चांदीच्या बाजारात फेरबदल कसा झाला?

गेल्या काही दिवसांपर्यंत सगळं काही सुरळीत सुरू होतं, मग अचानक सोन्याच्या किमती झपाट्याने वाढल्या. असं का झालं? मागील महिनाभर सोन्याच्या दरात दबाव दिसत होता आणि अनेक गुंतवणूकदारांना वाटत होतं की आता गोल्डमधील तेजीचा कल संपला आहे. काहींनी असं वाटतं होतं की सद्यस्थिती कायम राहिली तर, सोन्याच्या दरात आणखी घसरण होऊ शकते पण, मग अमेरिकेतील आर्थिक अहवालाने काही तासांतच बाजाराचा मूड बदलला.

Maharashtra TimesTop 5 Mutual Funds: 5 वर्षात 25 लाखांचा नफा; कमी खर्चात बंपर परतावा देणारे टॉप-5 फंड, 100-500 रुपये SIP तून होऊ शकता लखपती
अमेरिकेच्या (मध्यवर्ती बँकेचे) फेड रिझर्व्हचे नवनियुक्त अध्यक्ष केविन वॉर्श यांनी व्याजदरात लवकरच मोठी वाढ होणार नाही असे संकेत दिले, आणि इथूनच सोन्याच्या किमती फास्ट स्पीड पकडला. खुद्द फेडच्या अध्यक्षांकडून संकेत मिळताच सोन्याच्या किमतींनी यू-टर्न घेतला आणि सलग दुसऱ्या दिवशी वाढीसह व्यवहार करत आहेत.

अशाप्रकारे, विक्रीचा सपाटा लावणाऱ्या गुंतवणूकदारांनी अचानक खरेदी सुरू केली आणि किमती झपाट्याने वाढू लागल्या. बाजारात एकच चर्चा सुरू झाली की, देश-विदेशातील सोने आणि चांदीच्या तेजीचे कारण काय? यामागे एकच घटक नाही. रोजगाराची आकडेवारी, व्याजदर अपेक्षा, डॉलरमधील चढ-उतार, महागाईची चिंता आणि जगभरातील गुंतवणूकदारांची भावना या सर्वांमुळे सोन्याची झळाळी पुन्हा परतली.

Maharashtra TimesDonald Trump: भारताला ‘मृत अर्थव्यवस्था’ म्हणून हिणवणाऱ्या ट्रम्प यांनी भारतातूनच केली 81 कोटी रुपयांची कमाई, कसं ते समजून घ्या

सोन्याच्या किमतीत तेजी येणार का?


केविन वॉर्श यांनी आपल्या पहिल्या भाषणात व्याजदरात मोठी वाढ करण्याचे संकेत दिले नाही, तर व्याजदर 2 टक्क्यांवर स्थिर राहण्याचे संकेत दिले. तसेच अचानक आणि मोठ्या दरवाढीचे संकेत दिले नाही, असे कमोडिटी तज्ज्ञ म्हणतात. अशाप्रकारे, व्याजदर नरमाईच्या संकेतांमुळे सोन्याच्या किमतींनी झेप घेतली. याउलट फेड अध्यक्षांनी आक्रमक व्याजदर वाढीचे संकेत दिले तर, दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण होऊ शकते.

चार महिन्यांपासून सोन्याला घसरणीचे ग्रहण

29 जानेवारी रोजी सोन्याच्या किमतींनी उच्चांकी झेप घेतलेली, पण एका महिन्यात मौल्यवान धातूला उतरती कळा लागली. इतकेच नाही तर एकट्या जून महिन्यात सोन्याचा दर 11 टक्के घसरला तर, तिमाहीमध्ये जवळपास 14 टक्क्यांची घसरण झाली. 2008 नंतर सोन्याच्या किमतीत सर्वात मोठी एका महिन्यातील घसरण झाली. MCX वर आता सोन्याची किंमत ऑल-टाइम हायवरून 52000 रुपयांनी खाली आली असताना देशांतर्गत बाजारात सोने 36000 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

Maharashtra TimesIncome Tax Return: तुम्ही आगाऊ टॅक्स तर भरत नाहीत ना? ITR मध्ये मिळू शकते 60000 पर्यंतची कर सवलत, नक्की काय करावं लागेल समजून घ्या

व्याजदर अन् सोन्याचे कनेक्शन काय?

समजा तुमच्याकडे 10 लाख रुपये आहेत, आणि बँक तुम्हाला आकर्षक व्याज देत असेल तर तुम्ही काय कराल? बहुतेक लोक बँकेत आपला कष्टाची कमाई गुंतवतील. पण, व्याजदर कमी होऊ लागले तर लोक अधिक आकर्षक गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्यायाचा विचार करू लागती आणि सोने त्यापैकी आहे. सोन्यावर कोणतेही व्याज मिळत नाही, पण कठीण काळात सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. त्यामुळे, बाजाराला खात्री पटली की व्याजदर वाढणार नाही तर, सोन्याची मागणी वाढेल आणि किमतीवर परिणाम होईल.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा