Gold Price Fall June 2026: मंगळवार, 30 जून रोजी, सोन्याच्या किमतीत 1 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. यासह जागतिक बाजारात सोन्याची किंमत ऑक्टोबर 2008 नंतरच्या सर्वात मोठ्या मासिक घसरणीच्या दिशेने कूच करत आहे. मजबूत डॉलर आणि अमेरिकेत व्याजदर वाढीच्या अपेक्षेमुळे सोन्यावर दबाव आला असताना गुंतवणूकदार या आठवड्यात अमेरिकेच्या रोजगारविषयक आकडेवारीवर गुंतवणूकदारांचे लक्ष लागून असेल.

सोन्यात 18 वर्षांतील सर्वात मोठी घसरण
मंगळवार, 30 जून रोजी, MCX वरील सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याची किंमत 1800 रुपयांनी घसरली, तर चांदीची किंमत 2.21 लाखांच्या आसपास व्यवहार करत आहे. अशाप्रकारे, पिवळसर सोन्याची किंमत ऑक्टोबर 2008 नंतरच्या सर्वात मोठ्या मासिक घसरणीच्या दिशेने कूच करत आहेत. सध्या मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 140130 रुपये तर, 22 कॅरेट सोने 128500रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 105100 रुपये आहे.
Ethanol Petrol: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्सिंग केवळ चाचपणीसाठी, पुढच्या वर्षी अहवाल येतील! सरकारी वकिलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
सोन्याच्या किंमतीत आणखी घसरण होणार?
पश्चिम आशियातील अनिश्चितता कमी झाली आणि महागाई नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकेत व्याजदर वाढण्याच्या अपेक्षेमुळे अख्ख्या जून महिन्यात सोन्यावर दबाव कायम राहिला. तसेच मजबूत डॉलर आणि अमेरिकेतील व्याजदर वाढण्याच्या अपेक्षांनी सोन्यावरील दबावात लक्षणीय वाढ झाली. या दरम्यान, आता गुंतवणूकदार या आठवड्यात अमेरिकेच्या रोजगारविषयक आकडेवारीवर लक्ष ठेवून असतील जिथून फेडरल रिझर्व्हच्या भविष्यातील धोरणाबद्दल संकेत मिळतील.
सोन्याच्या किमतीत मोठी घट अपेक्षित
2024 नंतर प्रथमच सोन्याच्या दरात विक्रमी तिमाही घसरणीची शक्यात बळावली आहे, जी जून 2013 च्या तिमाहीनंतर सर्वात मोठी तिमाही घसरण असू शकते. इराण युद्धादरम्यान ऊर्जा किमतींमध्ये मोठी वाढ झाली, ज्यामुळे वाढत्या महागाईबद्दल चिंता वाढली आणि व्याजदर वाढीची अपेक्षा निर्माण झाली.
Share Market : ये रे ये रे पैसा… 1 लाखाचे झाले 3.40 लाख; एथर एनर्जीच्या गुंतवणूकदारांना सहा महिन्यातच सुपरडुपर फायदा!
फेडरल रिझर्व्हच्या हालचालींकडे नजर
सीएमई फेडवॉच टूलनुसार, फेडरल रिझर्व्ह यावर्षी तीनदा व्याजदर वाढ करू शकते. सप्टेंबरमध्ये सुमारे 64% दरवाढीची शक्यता असल्याचा अंदाज असून गुंतवणूकदार आता जूनच्या ADP रोजगार डेटा आणि नॉनफार्म पेरोल डेटावर लक्ष बारीक लक्ष ठेवून असतील. या आकडेवारीवरून फेडरल रिझर्व्हच्या भविष्यातील धोरणाबद्दल संकेत मिळू शकतात.
Property Rights: नातेवाईकांची परवानगी न घेता Joint प्रॉपर्टी विकू शकतो का? वडिलोपार्जित मालमत्ता कशी विकायची? जाणून घ्या नियम
मजबूत डॉलर, तेलही घसरले
दुसरीकडे, अमेरिकी डॉलरही बळावला असून सलग दुसऱ्या महिन्यात वाढीच्या दिशेने वाटचाल करत आहे, परिणामी इतर चलनात सोने खरेदी महाग झाली. या दरम्यान, तेलाच्या किमती 2020 नंतरच्या सर्वात मोठ्या तिमाही घसरणीच्या दिशेने कूच करताना दिसत आहे. इराणने अशी कोणतीही बैठक नियोजित नसल्याचे म्हटले तरीही या आठवड्यात दोहा येथे अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य चर्चेच्या परिणामावरही गुंतवणूकदार बारकाईने लक्ष ठेवून असतील.
(Disclaimer : सोन्या-चांदीमधील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते, तुम्ही सोने किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आधी तुमच्या भरवशाच्या आर्थिक तज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.)

