Today’s Gold and Silver Price 9 July 2026: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत शांतता करार पूर्णपणे ‘रद्द’ झाला आहे, असे जगासारमो स्पष्ट विधान करताच शेअर बाजार, क्रूड, आणि सोने-चांदीच्या दरांवर थेट परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा युद्ध भडकण्याचा धोका वाढला ज्याचा सर्वत्र पडसाद उमटले आहेत.

कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
अमेरिकेने इराणवर नव्याने हल्ले केल्यानंतर तेलाच्या किमतीत वाढ झाली. या हल्ल्यांमुळे संघर्ष लवकर संपेल आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझ पूर्णपणे पुन्हा सुरू होण्याच्या आशा मावळल्या आहेत. होर्मुझची वाट जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असून युद्धापूर्वी जागतिक तेल पुरवठ्यापैकी सुमारे एक-पंचमांश पुरवठा याच मार्गावरून व्हायचा.
सोने-चांदीचा आजचा दर काय?
गुरुवारी भारतात सोने आणि चांदीच्या किमती घसरत आहेत. COMEX वर सोन्याचा भाव 4804.70 डॉलरवर स्थिर राहिला असून आंतरराष्ट्रीय भू-राजकीय तणावाचा किमतींवर तात्काळ फारसा परिणाम झाला नसल्याचे यावरून दिसून येते, पण देशांतर्गत बाजारात सोने-चांदीच्या किमतींमध्ये घट झाली आहे. याशिवाय सकाळच्या सत्रात 9.10 वाजता MCX वर सोन्याचा वायदा 400 रुपयेपेक्षा जास्त घसरून 1.43 लाख रुपयांवर सपाट व्यवहार करत आहेत तर, चांदीचे फ्युचर्स 1600 रुपयांनी स्वस्त झाले आणि 2,21,755 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहेत.
देशांतर्गत सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,43,890 रुपये प्रति 10 ग्रॅमवर घसरला, ज्यामध्ये आदल्या दिवसाच्या तुलनेत 1.18% घट झाली. त्याचप्रमाणे, 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,31,803 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला, तर 18 कॅरेट सोन्याचा दर 1,07,917.5 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचवेळी, जागतिक बाजारात चांदीची किंमत 0.26 टक्के किंचित घसरणीसह 58.69 डॉलरवर खाली आला. तसेच भारतीय बाजारात चांदीचे भाव कालच्या नीचांकी पातळीच्या तुलनेत 3.35% घसरून 2.29 लाख रुपये किलोवर पोहोचले.
सोने-चांदीच्या घसरणीचे अमेरिका-इराण कनेक्शन
भू-राजकीय तणाव आणि जागतिक अनिश्चिततेच्या काळात चांदीने याआधी वर्षाला सुरुवातीला विक्रमी उच्चांक गाठला होता, पण गेल्या काही महिन्यांपासून किमतींमध्ये चढ-उतार दिसून येत आहेत.
Ethanol Fuel Controversy: भारतात पुन्हा इथेनॉलविरहित पेट्रोल? सरकारकडून नव्याने चाचपणी सुरू; तेल कंपन्यांकडून मागवल्या सूचना
पश्चिम आशियातील तणाव निवळण्याच्या उद्देशाने अमेरिका-इराण यांच्यातील चारचा फिस्कटली, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 5% हून जास्त वाढ झाली आणि जगात जागतिक बाजारात महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली, ज्यामुळे फेडरल रिझर्व्हला व्याजदर वाढवणे भाग पडेल अशी भीती निर्माण झाली. यामुळे गुंतवणूकदारांना सोने आणि चांदीमधून आपला पैसा सरकारी रोख्यांमध्ये वळवावा लागेल, ज्यामुळे मौल्यवान धातूंची मागणी कमी होईल आणि किमती घसरतील.

