Gold Silver Price Today: मागील काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या दरांमध्ये प्रचंड दबाव पाहायला मिळत आहे. जानेवारीपर्यंत उच्चांकी उभारी घेतलेल्या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत सतत चढ-उतार होत असून एकीकडे जून महिन्यात घसरणीचा नवीन विक्रम नोंदवला तर, जुलैच्या पहिल्या पाचच दिवसांत सोने-चांदीने गमावलेली आघाडी पुन्हा मिळवली. अशा स्थितीत, गुंतवणूकदार आणि खरेदी करणारे ‘आता खरेदी करायची की नाही’? याच संभ्रमात आहेत.
सोने-चांदीचा आजचा दर काय
गेल्या आठवड्यात किमतींमध्ये लक्षणीय चढउतार दिसून आला, पण शुक्रवारी, शेवटच्या व्यापार दिवशी, किमतींमध्ये मोठी वाढ झालेली. मागील आठवड्यात अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षांनी आक्रमक व्याजदर वाढ करण्यात मवाळ भूमिका घेतली. सलग चार आठवड्यांच्या घसरणीनंतर MCX वर सोन्याच्या वायदा दरात वाढ नोंदवली गेली, तर चांदीचा आलेखही उच्च राहिला. पण, 6 जुलैपासून सुरू होणाऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच बाजाराची चाल बदलली.
सोमवार, आठवड्याच्या पहिल्याच व्यापार दिवशी, (6 जुलै) MCX वर सोन्याचा ऑगस्ट वायदा सोमवारी सकाळी किंचित घसरला पण, 1.47 लाख रुपयांवर स्थिर राहिला. तसेच चांदीच्या फ्युचर्स 2.37 लाखांवर किंचित घसरणीसह व्यवहार करत आहेत. अशाप्रकारे, 24 कॅरेट 10 ग्रॅमची किंमत 1,46,720 रुपये तर 22 कॅरेट 10 ग्रॅमचा सोन्याचा दर 1,34,490 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम दर 1,10,040 रुपये आहे.
सध्या अख्ख्या जगाचे लक्ष सोन्याच्या किमतीकडे लागून आहे. अमेरिकेच्या रोजगारविषयक आकडेवारीनंतर व्याज दरांबाबत अपेक्षांमध्ये मोठा बदल झाला, ज्याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर होत आहे. यामुळेच सोने जवळपास 2 आठवड्यांतील सर्वोच्च पातळीजवळ व्यवहार करत आहे.
EPFO Rule Changes Explained: 3 दिवसांत क्लेम सेटल होणार, पण ठरलेल्या तारखेला PF जमा न झाल्यास मिळणार 12% व्याज, जाणून घ्या नवीन नियम अमेरिकेतील जून महिन्यातील रोजगार अहवाल अपेक्षेपेक्षा कमकुवत राहिल्याने फेड रिझर्व्हकडून नजीकच्या काळात व्याजदर वाढवण्याच्या शक्यता जोर धरू लागल्या आणि अमेरिकन डॉलरमध्ये काही प्रमाणात कमजोरी आली, ज्यामुळे मौल्यवान धातूंच्या खरेदीवर दबाव कायम राहिला. दुसरीकडे, अमेरिकेतील रोजगाराची कमकुवत आकडेवारी आणि तेलाच्या किमतीतील घसरणीमुळे सोने-चांदीतील चढउतार कायम राहिले, पण आंतरराष्ट्रीय बाजारात कॉमेक्सवर सोन्याचे भाव प्रति औंस $4,209.60 पर्यंत घसरले.
लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.
मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.
पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.
2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.
शैक्षणिक पात्रता
प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.… आणखी वाचा