Headlines

Girish Mahajan | व्हीआयपी ताफा सोडून एसटी बसने प्रवास! त्र्यंबकेश्वरमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन यांचा अनोखा अंदाज


नाशिक : श्रावण सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढलेली संख्या पाहता राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन, कुभमेळा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळी खंबाळे वाहनतळ ते त्र्यंबकेश्वरदरम्यान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी बस) बसने प्रवास केला.

पालकमंत्री महाजन यांच्यासमवेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह आदींनीही प्रवास केला.

देशातील बारा जोतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये आज श्रावण सोमवारनिमित्त राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने भाविक दर्शन व ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेसाठी येतात. श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची गर्दी आणि वाहतूक कोंडी झाली होती. या पार्श्वभूमीवर आज प्रशासनाने त्र्यंबक शहरापासून चार किलोमीटर अंतरावर खंबाळे या ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था केली आहे. तेथून एसटी बसने भाविकांना त्रंबकेश्वर पर्यंत व तिथून पार्किंग अशी एसटी बसची व्यवस्था केली आहेत.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या नियोजनाची पाहणी तसेच आपल्या वाहनांच्या ताफ्यामुळे भाविकांना त्रास होवू नये याची काळजी घेत पालकमंत्री  महाजन यांनी एसटी बसमधून प्रवास करण्यास प्राधान्य दिले. यादरम्यान, पालकमंत्री  महाजन यांनी श्रावण सोमवारनिमित्त जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेऊन काही मौलिक सुचनाही केल्या.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत