Headlines

Girish Mahajan: नाशिक सर्वांत सुंदर करु! खड्ड्यांवरुन असंतोषानंतर कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही – girish mahajan says their resolve to make nashik the most beautiful city in maharashtra


Girish Mahajan: शहराला सुंदर करायचे असेल, तर खोदकाम करावे लागेल. अधिकारी, ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून चालणार नाही, असेही ते म्हणाले.

nashik
गिरीश महाजन(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
नाशिक: ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी खड्ड्यांवरून नाराजी व्यक्त केली असली, तरी आम्ही नाशिकच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करीत आहोत. नाशिकला राज्यातील सर्वात सुंदर शहर करण्याचा आमचा संकल्प असून, आम्ही त्या मार्गावर आहोत, असे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी स्पष्ट केले.

महाजनांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘शहरात ड्रेनेज, पाणी पुरवठा, फायबर केबल, एमएनजीएलची लाइनदेखील रस्त्यांच्या खालून टाकत आहोत. अशा आठ ते नऊ यूटिलिटीजची कामे एकाचवेळी सुरू आहेत. यासाठी रस्ते खोदण्यात आले असून, जमीन खालीवर झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे झाले आहेत. आठ दिवसांत सर्व खड्डे बुजविण्यात येतील.

Maharashtra TimesDevendra Fadnavis : माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, देवेंद्र फडणवीस यांच्या काकांचं मोठं वक्तव्य
पुढील चार महिन्यांमध्ये रस्त्यांची कामे पूर्ण होणार असून, सर्व रस्ते काँक्रीटचे होणार आहेत. त्यामुळे पुढील किमान ४० वर्षे रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही. प्रशासनातील अधिकारी, ठेकेदारांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी एका वकील बांधवाने पोलिसांकडे केल्याकडे महाजनांचे लक्ष वेधण्यात आले. याबाबत ते म्हणाले, ‘मागच्या सिंहस्थात तीन हजार कोटींची कामे झाली. त्यावेळेला एकही रस्ता आम्ही घेतला नव्हता. यावेळी एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. गुन्हे दाखल करून चालणार नाही. अधिकारी, कर्मचारी, ठेकेदारांना कामे वेगाने करण्याबाबत सक्त ताकीद दिली आहे.

महाजनांनी अनुभवला
खड्ड्यांमधील प्रवास

आरोग्य विज्ञान विद्यापीठात रविवारी वृक्षारोपणासाठी जाताना मखबलाबाद-म्हसरूळ परिसरात मंत्री गिरीश महाजन यांनीदेखील प्रवासात खड्ड्यांमुळे होणारा त्रास अनुभवला. त्यांनी वाहनातून उतरून खड्ड्यांची पाहणीदेखील केली. विद्यापीठातील कार्यक्रमात जाहीरपणे खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाची जाणीव असल्याचे सांगत आठ दिवसांत खड्डे बुजविण्यात येतील, अशी ग्वाही दिली. चार महिन्यांत काँक्रीटचे रस्ते होतील, याबाबत नागरिकांना आश्वस्त केले.
Maharashtra TimesOnion Procurement: केंद्राकडून ‘यूआरएस’ कांदा खरेदी बंद; नाशिकसह राज्यभरात शेतकरी आक्रमक
बेळे कुटुंबाला पाच लाख मदत
खड्ड्यामुळे अपघाती निधन झालेल्या दीपाली बेळे यांच्या घरी भेट देऊन महाजन यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. मुलीसोबत मोपेडवरून जाताना खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर इजा होऊन दीपाली बेळे कोमात गेल्या होत्या. ३९ दिवसांच्या उपचारांनंतरही त्यांचा जीव वाचू शकला नाही. उपचारांवर मोठा खर्च झाला असून, सरकारच्या वतीने या कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.

महाजन म्हणाले…
– विक्रमी पावसामुळे कंत्राटदारांना कामे करण्यात अडचणी
– वेगवेगळ्या पद्धती व तंत्राद्वारे खड्डे बुजविणे युद्धपातळीवर सुरू
– मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने आम्ही कंत्राटदारांना ‘स्टार रेट’ही दिला आहे.
– डांबर, व्यावसायिक डिझेलचे दर दुपटीने वाढल्यामुळे खर्चात सहा ते सात कोटींचा फरक
– पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंची तुलनाच होऊ शकत नाही
– देशात इंदूरपाठोपाठ स्वच्छतेच्या बाबतीत नाशिकचा क्रमांक

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा