Headlines

Gautam Adani US Criminal Charges Dismissed; अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; Criminal Case रद्द, लाचखोरी-फसवणुकीचे आरोप मागे; 18 दशलक्ष डॉलर्सचा दंड


Adani Case News: अमेरिकेतील न्यायालयात सुरू असलेल्या एका खटल्यात गौतम अदानी ंना मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकन न्यायालयाने गौतम अदानी, त्यांचा भाचा सागर आणि सहकारी विनीत जैन यांच्यावरील फौजदारी खटला रद्द केला. या दरम्यान, SEC ने दाखल केलेल्या वेगळ्या दिवाणी खटल्यानुसार गौतम अदानींना 6 दशलक्ष डॉलर्स आणि सागर अदानींना 12 दशलक्ष डॉलर्सचा दिवाणी दंड भरावा लागेल.

अशा परिस्थितीत, आता पुढील काही तासांत भारतीय शेअर बाजाराच्या सुरुवातीसह गुंतवणूकदार दंडापेक्षा फौजदारी खटला रद्द होणे आणि कायदेशीर अनिश्चितता कमी होण्याला किती अधिक महत्त्व देतात, याकडे बाजाराचे लक्ष लागलेले आहे.

Maharashtra TimesTitan Share: बाजाराच्या मूड स्वींगमध्ये 7 महिन्यांत 80000 कोटींचा परतावा, श्रीमंतीचा रुबाब दाखवणारा TATA शेअर बनला रॉकेटखटला रद्द तरी दंड का?

अमेरिकेन न्यायालयातील या हालचालींमधील हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. अमेरिकेतील फौजदारी खटला आणि एसईसीचा दिवाणी खटला या दोन वेगवेगळ्या कायदेशीर कारवाई होत्या. अमेरिकेत अदानींवर दोन वेगवेगळे खटले होते –

न्याय विभागाद्वारे फौजदारी खटला

अमेरिकेच्या न्याय विभागाने एकीकडे फसवणूक आणि लाचखोरीचे आरोप करत फौजदारी खटला दाखल केलेला, पण गौतम अदानी आणि सागर अदानी सतत आरोप फेटाळत आले. मे महिन्यात अमेरिकेच्या न्याय विभागाने या खटल्याचा पाठपुरावा न करण्याचा निर्णय घेतला आणि रद्द करण्याची न्यायालयाला विनंती केली. अशाप्रकारे, आता अमेरिकेचे जिल्हा न्यायाधीश निकोलस गॅराफिस यांनी सगळे फौजदारी आरोप रद्द केले आहेत.

Maharashtra Timesशिक्षक मागताहेत गलेलठ्ठ पगार, OPS, रिटायरमेंटचे वय अन् भरपूर सुट्ट्या; मॅरेथॉन बैठकीनंतर 8व्या वेतन आयोगातील नवीन अपडेट

SEC ची दिवाणी तक्रार

दुसरीकडे अमेरिकी शेअर मार्केट नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन – SEC – ने दिवाणी तक्रार दाखल केलेली, ज्यामध्ये अदानींना दंड ठोठावला गेला आहे. सोप्या भाषेत बोलायचे तर, एकाच घटनेसंदर्भात दोन वेगवेगळ्या कायदेशीर मार्गांचा अवलंब केला गेला असून फौजदारी खटला आता रद्द केला गेला, तर एसईसीचा दिवाणी खटला दंड आणि इतर अटींसह मिटवला आहे.

अदानी ग्रीन एनर्जीच्या एक्सचेंज फाइलिंगनुसार, अमेरिकन न्यायालयाने 10 ऑगस्ट, 2026 रोजी SEC च्या दिवाणी तक्रारीवर सहमतीने अंतिम निकाल दिला. या करारानुसार गौतम अदानींना 6 दशलक्ष डॉलर्स तर, सागर अदानींना 12 दशलक्ष डॉलर्सचा दिवाणी दंड भरावा लागेल. अशाप्रकारे, एकूण 18 दशलक्ष डॉलर्स रक्कम दंड भरावी लागेल.

मात्र, येथील आणखी एक मुद्दा म्हणजे की हा 18 दशलक्ष डॉलर्सचा दंड अदानी ग्रीन एनर्जीवर लादला नाही. कंपनीच्या फाइलिंगमध्ये गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्यासाठी स्वतंत्र दिवाणी दंडांचा उल्लेख असून गुंतवणूकदारांनी हा फरक समजून घेतला पाहिजे.

Maharashtra TimesGold Exchange: 32 ग्रॅम सोने अन् 35000 रुपये; जुन्या दागिन्यांच्या बदल्यात नवीन अंगठी बनवायचं आश्वासन देऊन ग्राहकाची फसवणूक, आता न्यायालयाने दिले आदेश

अमेरिकी कोर्टाच्या निर्णयावर गौतम अदानींची प्रतिक्रिया

दरम्यान, अमेरिकी कोर्टाच्या निकालानंतर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानींनी आपल्यावरील फौजदारी आरोप फेटाळून लावण्याच्या अमेरिकन न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आणि न्यायव्यवस्थेच्या प्रक्रियेबद्दल आपल्याला नेहमीच ‘अत्यंत आदर’ राहिल्याचे म्हटले.

तसेच अब्जाधीश उद्योगपतीने दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर लढाईच्या निकालाचे सत्य, निष्पक्षता आणि कायद्याचे राज्य यांच्या विजयाचे प्रतीक अशा शब्दांत वर्णन असे केले. सोमवारी उशिरा X वर प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात, अदानींनी आपल्या समर्थकांचे आभार मानले आणि भारताच्या विकासामध्ये आपल्या समूहाची कटिबद्धता पुन्हा अधोरेखित केली.

“न्यायव्यवस्थेच्या प्रक्रियेबद्दलचा आदर आणि नम्रता बाळगून मी अमेरिकेच्या न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो,” असे अदानींनी X वरील पोस्टमध्ये म्हटले. याशिवाय “या आव्हानात्मक काळात सत्य, निष्पक्षता आणि कायद्याचे राज्य यांवरील आमचा विश्वास अढळ राहिला,” असेही पुढे लिहिले आणि या प्रकरणातील प्रदीर्घ कायदेशीर प्रक्रियेदरम्यान अदानी समूहाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्यांचेही आभार मानले.

अमेरिकेच्या न्याय विभागाने नोव्हेंबर 2024 मध्ये भारतीय सरकारी संस्थांकडून सौर ऊर्जेचे फायदेशीर कंत्राट मिळवण्यासाठी 265 दशलक्ष डॉलर्सच्या लाचखोरीच्या प्रकरणात अदानी समूह आणि सहकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप करणारे आरोपपत्र सार्वजनिक केल्यानंतर जवळपास 2 वर्षांनी प्रकरण मिटले. याव्यतिरिक्त, समूहाच्या भ्रष्टाचार-विरोधी उपक्रमांबाबत खोटी माहिती देऊन अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात सहभागी असल्याचा अदानींवर आरोपही केला गेला होता.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत