यंदा गणेशोत्सवासाठी मुंबईसह ठाणे, पालघर, पुणे आणि नागपूर येथे राहणाऱ्या कोकणवासीयांसाठी मध्य रेल्वेने २४६, तर पश्चिम रेल्वेने ६० विशेष फेऱ्या जाहीर केल्या आहेत. प्रवासी संघटनांनी मात्र ४०० फेऱ्यांची मागणी केली आहे.
Dr Surdas on Ajit Pawar : श्रीमद्भगवद्गीता वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाही, ‘इस्कॉन’च्या डॉ सूरदास यांचा दावा, अजित पवारांनाही पुस्तक दिलेलं, त्यांनी वाचलं असावंमुंबई-खेड मार्गाचे उदाहरण घेतल्यास नियमित गाडीतील शयनयानाचे ( स्लीपर ) भाडे २०५ रुपये आहे. त्याच मार्गासाठी विशेष गाडीच्या स्लीपरसाठी ४०० रु. लागतात. एसी थ्री टायरसाठी ५२० रुपयांऐवजी १,०७० रुपये, तर एसी टू टायरसाठी ७२५ रुपयांऐवजी तब्बल १,४७० रुपये आकारले जाणार आहेत. म्हणजेच, विशेष गाडीच्या स्लीपरसाठी नियमित गाडीच्या तुलनेत जवळपास दुप्पट भाडे द्यावे लागते.
गणेशोत्सवात कोकणासाठी नियमित गाड्यांची क्षमता वाढवण्याऐवजी विशेष गाड्यांचा पर्याय पुढे केला जातो. मात्र, ‘पर्याय’ देण्याच्या नावाखाली अतिरिक्त पैसे मोजावे लागतात. त्यानंतरही विशेष गाड्यांना कमी प्राधान्य मिळत असल्याने तीन ते पाच तास, तर कधी त्याहून अधिक विलंब होतो.
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा आता इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅन्टीनला दणका; मुंबईतील दोन हॉटेलचा परवानाही निलंबित, कारवाईचा धडाका सुरूचकिमान अंतराची अट रद्द करा
रेल्वे बोर्डाने २०१५ मध्ये विशेष गाड्यांसाठी तयार केलेल्या नियमांमध्ये ३० टक्के वाढीव भाड्याची तरतूद केली आहे. प्रत्यक्ष प्रवास ५०० किमीपेक्षा कमी असला तरी किमान ५०० किमीचे भाडे लागू होते. याचा सर्वाधिक फटका २०० ते ३०० किलोमीटर प्रवास करणाऱ्यांना बसतो. वाढीव दर असताना त्यात किमान अंतराची अट अन्यायकारक आहे. रेल्वे मंत्रालयाने या धोरणाचा फेरविचार करून विशेष गाड्यांसाठी लागू असलेली किमान अंतराची अट रद्द करावी, अशी मागणी कोकण विकास समितीचे सदस्य अक्षय महापदी यांनी केली आहे.
