नाशिकचे प्रसिद्ध मूर्तिकार शांताराम मोरे यांच्या कुटुंबातील चौथी पिढी हा वारसा समर्थपणे पुढे नेत आहे. यंदा त्यांच्या कारखान्यातून अमेरिका, इंग्लंड, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, न्यूझीलंड, सिंगापूर, मलेशिया, फ्रान्स, जपान, इटली, नेदरलँड्स, आयर्लंड, संयुक्त अरब अमिराती आणि थायलंड या सतरा देशांत गणेशमूर्ती रवाना झाल्या आहेत.
Prithviraj Chavan: ही सरकारच्या शेवटाची सुरुवात! ‘जेन झी’च्या आंदोलनाबाबत माजी मुख्यमंत्री चव्हाणांचा निशाणा..या रुपांतील मनमोहक मूर्ती
नाशिकच्या या कारखान्यांमध्ये शाडू माती आणि ‘पीओपी’च्या लालबागचा राजा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, टिटवाळा गणपती, चिंतामणी, मयूरेश्वर, सिद्धिविनायक, पेशवाई रूप, बालगणपती, राजापूरचा राजा, सिंहासनारूढ गणेश, पद्मासन गणेश, शंख-चक्रधारी, गरुडारूढ, उंदरावर – स्वार, नटराज रूप, बाजीराव-मस्तानी रूप, कृष्ण अवतार, पंचमुखी गणपती, मयूरारूढ आणि निसर्ग-पर्यावरणपूरक शाडू गणपती यांसारख्या वीसहून अधिक विविध रुपांतील मनमोहक मूर्ती साकारण्यात आलेल्या आहेत.
प्रतवारीनुसार ठरतात दर
परदेशात जाणाऱ्या या मूर्तीच्या किमती पॅकिंग, कुरिअर, तसेच त्यांचा आकार, माती आणि नक्षीकामावर ठरतात. लहान व मध्यम आकाराच्या शाडूच्या मूर्तीची किंमत दोन हजार ५०० रुपयांपासून आठ हजार रुपयांपर्यंत आहे. मोठ्या, विशेष नक्षीकाम असलेल्या आणि भव्य सिंहासनावरील मूर्ती १० हजार रुपयांपासून ५० हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
Nashik Crime : 43 वर्षीय बॉयफ्रेण्डने नाशिकच्या 34 वर्षीय विवाहितेला संपवलं, सात वर्षांची लेक पोरकी, लग्नबाह्य संबंधांचा दुर्दैवी शेवट… असे केले जाते पॅकिंग
परदेशांत गणेशमूर्ती सुरक्षित पोहोचाव्यात यासाठी अत्यंत काळजीपूर्वक विशेष पॅकिंग केले जाते. सर्वप्रथम मूर्तीला मऊ कापूस आणि बबल रॅपने सुरक्षित वेढले जाते. त्यानंतर थर्माकोलच्या साहाय्याने बॉक्समध्ये मूर्ती हलणार नाही, अशा पद्धतीने घट्ट बसविली जाते. अंतिम टप्प्यात मजबूत लाकडी पेट्यांमध्ये मूर्ती ‘सील’ करू करून कार्गो किंवा हवाई वाहतुकीद्वारे पाठविली जाते. त्यामुळे लांबच्या प्रवासातही मूर्तीला धक्का बसत नाही.
Nashik News : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीने भरलेला डंपर 10 ते 12 फूट खाली अडकलाआमची चौथी पिढी या व्यवसायात आहे. दरवर्षी ग्राहकांची मागणी वाढत आहे. मुलेही मोठ्या प्रमाणात मदत करीत असल्याने कामाचा फारसा ताण येत नाही. वर्षभरापासून नियोजन असते. – शांताराम मोरे, मूर्तिकार
दरवर्षी नवनव्या संकल्पना घेऊन मूर्ती साकारत असतो. यंदाही मूर्तीमध्ये वेगळेपण आहे. आकारामध्येही बदल झाले आहेत. बाहेरच्या देशांत मूर्ती पाठविताना विशेष काळजी घ्यावी लागते. पैसेही मिळतात आणि काम करायलाही मजा येते. –अमोल सोनवणे, मूर्तिकार

