Headlines

Gaganbawda Crime | भावाने स्टेटस पाहिलं, पोलिसांना फोन केला; काही मिनिटांत वाचला भावाचा जीव!


गगनबावडा : भावपूर्णश्रद्धांजली असा आपल्या भावाने मोबाईलवर स्टेटस ठेवल्याची माहिती ११२ नंबर वरून मिळताच गगनबावडा पोलिसांनी तत्काळ त्या दिशेने चौकशी व कारवाई केल्याने कर्जास कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास नितीन पाटील यांनी ११२ नंबरवर कॉल करूनसांगितले कि आपला भाऊ गगनबावडा येथे गगनगिरी मठामध्ये आला असून त्याने कर्जबाजारीपणास कंटाळून आत्महत्या करणार आहे.

त्याच्या मोबाईलमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली असा स्टेटस ठेवला आहे. तरी त्याचा शोध घ्यावा अशी विनंती केली.माहिती मिळताच, ए. एस.आय ठाकूर व पोलीस हवालदार देसाई यांनी नातेवाईकांकडून त्याचा फोटो वॉटस्अॅपवर मागवून घेऊन ३ पथक तयार केले. या पथकात एएसआय ठाकूर, पोलीस हवालदार देसाई, कांबळे, इंजूळकर यांचा समावेश होता.

या पथकाने तपासादरम्यान, गगनबावडा बस स्थानक, भुईबावडा घाट भागातील फुटेज तपासून शोध घेतला असता, एक अनोळखी व्यक्ती गगनगिरी गडाकडे जाणाऱ्या रोडवर आढळला. दरीच्या रेलिंगजवळ ती व्यक्ती उभी होती. त्याच्या जवळ जावून पोलिसांनी त्याची
समजूत काढली. त्याच्याशी गोड बोलून त्याची चौकशी करून नाव, पत्ता विचारला. त्याने त्याचे नाव सांगितले.

त्यास विचारणा केली असता त्याला कर्ज जारत झाल्याने तो जीवन संपवण्याचा विचार करीत होता, त्याचे सर्वांनी मनपरिवर्तन करून पोलीस ठाण्यात आणले. त्याच्या नातेवाईकांना कळविण्यात आले असून त्याचे नातेवाईकांशी फोनवरून बोलणे करून दिले आहे. त्याने आत्महत्येचा निर्णय बदलला आहे. नातेवाईक पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्याला त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत