Gadchiroli Snake Bite Three Student Death: गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून तिथे सुविधांचा अभाव आहे. मुलींना सकस जेवण मिळत नाही, झोपायला पलंग नाहीत. जमिनीवर गादी टाकून झोपावे लागते. वसतिगृहास लागून दगड-विटांचे ढिगारे आहेत.

आदिवासी भागात शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी होणारे प्रयत्न, आदिवासी मुलींनी अधिकाधिक शिक्षण घेत मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे म्हणून सुरू असलेली धडपड या सगळ्यांवर अशा घटना पाणी ओततात. त्याच वेळी सुरक्षा यंत्रणा, कागदावर किती मजबूत आणि प्रत्यक्षात मात्र किती कमकुवत आणि दुबळ्या असतात, यावर प्रकाश टाकतात. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा या तालुक्याच्या मुख्यालयापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या जपतलाई या गावातील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत ही घटना घडली. तिथे पहिली ते दहावी वर्गात २२३ मुले शिक्षण घेतात. मुलींसाठी वसतिगृह आहे.
लाकडांच्या थप्प्या आहेत. तिथे साप-विंचवांचा खुला वावर आहे. त्यातील एका विषारी सापाने खिडकीतून प्रवेश केला. एकापाठोपाठ एक मुलींना दंश केला. त्यातील दोघींना दहा किलोमीटवर असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी न्यायचे तर रस्ता नीट नाही. पंचवीस किलोमीटरचा वळसा घालून त्यांना न्यावे लागले. अशा वेळी ‘गोल्डन अवर्स’मध्ये सुविधांची काय अपेक्षा करणार? मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिल्याने एक गंभीर मुलगी नागपुरात उपचारार्थ आणली गेली. आता त्यांच्याच आदेशाने आश्रमशाळेचा परवाना निलंबित होणार आहे.
मुख्य सचिव बैठक घेऊन सुरक्षेची दिशा ठरविणार आहेत. ही शाळा काँग्रेसच्या नेत्याची असल्याने त्याचे राजकीय पडसाद उमटतील. ज्या मुलांचे जीव गेले, त्यांचे काय, त्यांच्या पालकांचे काय? ते नुकसान आर्थिक मदतीतून कसे भरून निघणार? आश्रमशाळेतील इतर मुलांवर ही वेळ येऊ नये म्हणून सुरक्षा आणि सुविधा यांची व्यवस्था केली जाईल का, हा खरा प्रश्न आहे. ही घटना सर्पदंशाची आहेच; मात्र व्यवस्थेला निष्काळजीपणाचे सर्प किती घट्ट वेटोळे करून बसलेत हे दर्शविणारी आहे. मुलींच्या हाती पुस्तक असावे, असे वाटत असेल तर तिला सुरक्षा द्यावी लागेल. त्यासाठी असुविधांचे सर्प ठेचावे लागतील.

