Headlines

Gadchiroli Akola and Bhandara on the day of Pola Festival Three People Drowned; पोळा सणाला गालबोट, एकाच दिवशी चौघे बुडाले, तिघांचा मृत्यू, एकुलता एक रिशान गेल्यानं आईचा टाहो; मृतदेह खाटेवर नेला


Vidarbha Three People Drown : विदर्भात पोळा या सणाला गालबोट लागलेला आहे. विदर्भातील गडचिरोली, अकोला आणि भंडारा जिल्ह्यात तीन जणांचा वाहून मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये तर एका सहा वर्षीय मुलाचा देखील समावेश आहे. एकुलता एक रिशान गेल्यानं आई-वडिलांनी एकच टाहो फोडला आहे. कुटुंबियांचा आक्रोश बघून उपस्थितांचे पण डोळे पाणावले आहेत.

Three People Drowned
विदर्भात तिघांचा बुडून मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा.प्रतिनिधी, गडचिरोली : पोळ्याचा आनंद ओसंडून वाहत असताना आज शुक्रवारी विदर्भाच्या भंडारा , गडचिरोली आणि अकोला जिल्ह्यातील चौघे वाहून गेले. यातील तिघांचा मृत्यू तर एकाचा शोध सुरू आहे. भंडारा जिल्ह्यातील शिंगोरी शिवारामध्ये नाल्याच्या पाण्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी घडली. किसन भानुदास गायधने (वय ३६) असं मृताचं नाव आहे. किसन २० ऑगस्टला सायंकाळी आपली जनावरे बांधण्यासाठी शेतावर गेले होते. सायंकाळ होऊनही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. शुक्रवारी नाल्यातील पाणी कमी झाल्यानंतर त्यांचा मृतदेह आढळला.

दुसरी घटना भंडारा शहराजवळील खमारी (बुटी) येथे घडली. वैनगंगा नदीत बुडून निलेश रामू मारवाडे (वय ३०) यांचा मृत्यू झाला. निलेश हे २० ऑगस्ट रोजी सकाळी घरून निघाले होते. रात्र होऊनही घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. कारधा पोलिसांत तक्रार दाखल केली. शुक्रवारी दुपारी पावणेदोन वाजता वैनगंगा नदीच्या झिरी घाटावर त्यांचा मृतदेह आढळला. कारधा पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

Maharashtra Timesबेस्ट पतपेढी निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेत भूकंप, बड्या नेत्याचा राजीनामा

पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी पिढी नदीवर गेलेला युवक पुरात वाहून गेला. मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खोळद येथे आज शुक्रवारी सकाळी घडली. शंतनू अविनाश मानकर (वय २५) असं वाहून गेलेल्या युवकाचं नाव आहे.

शवविच्छेदनासाठी खाटेवरून नेला मृतदेह

पोळ्यासाठी शाळेतून सुटी घेऊन आलेला सहा वर्षीय बालक गावाजवळील नाल्यात वाहून गेला. आज शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला. शवविच्छेदनासाठी मृतदेह भामरागड तालुका मुख्यालयात न्यायचा होता. गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने अडचण निर्माण झाली. शेवटी खाटेची कावड करून मृतदेह नेण्यात आला. ही घटना गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील कोयर येथे आज समोर आली.

Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar Crime : मोकळ्या प्लॉटवर ढोल ठेवण्यास नकार, कुटुंबावर धारदार शस्त्राने हल्ला, एकाचा मृत्यू; संभाजीनगर हादरलं

रिशान प्रकाश पुंगाटी (वय ६ वर्ष, रा. कोयर, भामरागड) असं मृत बालकाचं नाव आहे. रिशान हा गावापासून १० किमी अंतरावरील लाहेरीच्या शासकीय आश्रमशाळेत इयत्ता पहिलीत शिक्षण घेत होता. पोळ्याचा सण असल्याने त्याच्या वडिलांनी त्याला गावाकडे आणले. रिशान काल गुरुवारी दुपारी गावालगत असलेल्या नाल्याजवळ खेळायला गेला होता. खेळत असताना नाल्यात गेला असता वाहून गेला. आज शुक्रवारी सकाळी शोध मोहिमेत त्याचा मृतदेह आढळला. शवविच्छेदनासाठी भामरागड तालुका मुख्यालयात न्यायचे होते. गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्याने रुग्णवाहिका येऊ शकत नव्हती. शेवटी खाटेची कावड करून मृतदेह नारगोंडापर्यंत आणून नंतर भामरागड तालुका मुख्यालयात नेण्यात आले. गडचिरोलीच्या दुर्गम भागात अजूनही रस्त्याची सोय नसल्यावरून संताप व्यक्त होत आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा