Headlines

Food and Drug Commissioner Tukaram Mundhe Mumbai High Court Canteen Raid No Record of Canteen; : तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच! आता थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या कॅन्टिनवर छापा, धक्कादायक तपशील उघड


Tukaram Mundhe Bombay High Court Canteen Raid : एफडीएच्या पथकाने काल गुरुवारी थेट मुंबई हायकोर्टाच्या आवारातील कॅन्टिनची तपासणी केली. यामध्ये एका कॅन्टिनने परवानगी घेतली नसल्याचं समोर आलं.

Tukaram Mundhe Bombay High Court Canteen Raid
तुकाराम मुंढे उच्च न्यायालय कॅन्टिन छापा(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विभागाला मंगळवारी 28 जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाने कारवाई संदर्भात प्रश्न विचारले होते. त्यानंतर एफडीएचं पथक काल गुरुवारी उच्च न्यायालयात दाखल झालं. मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारातील उपहारगृहांची तपासणी एफडीएकडून सुरू करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाकडून केलेल्या तपासणी दरम्यान उच्च न्यायालयातील एका उपहारगृहाची नोंदणीच झाली नसल्याचं स्पष्ट झालं. नियमानुसार नोंदणी नसलेल्या उपहारगृहांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. अन्न व औषध प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरातील कॅन्टिनची तपासणी केल्याने या कारवाईची चर्चा रंगली आहे.

निमसरकारी आस्थापनांचीही तातडीने तपासणी करण्याचे आदेश

मुंबई हायकोर्टाने मंगळवारी 28 जुलै झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयानं खासगी आस्थापनांवर कारवाईचा धडाका लावणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच प्रश्चिन्ह उपस्थित केलं होतं. आजवर किती मंत्रांच्या आणि सरकारी आस्थापनांवर छापे टाकले अशी विचारणा करत मंत्रालयासह उच्च न्यायालय, सरकारी आणि निमसरकारी आस्थापनांचीही तातडीने तपासणी करण्याचे आदेश दिले होते.

Maharashtra TimesRain News: धक्कादायक! मुसळधार पावसात आर्टिगा कार गेली वाहून; फक्त बाप वाचला, शिक्षिकेसह दोन मुली बेपत्ता
तुकाराम मुंढे यांनी एफडीएच्या कार्यपद्धतीवर ज्याप्रकारे कोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले की, ‘एफडीएची कारवाई ही भारतात जो कायदा निर्माण झाला त्यानुसारच महाराष्ट्रात कारवाई होत असल्याचं’ म्हटलं. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधील प्रयोग शाळेतील अधिकाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर जे प्रश्न उपस्थित केले आणि त्यांची तक्रार केली यावर तुकाराम मुंढेंनी प्रतिक्रिया दिलेली नाही.

Maharashtra TimesVirar Crime : माझं बाळ द्या… सुनेनं लेकीला खेचलं, सासऱ्यांनी जोरात ढकललं, 28 वर्षांच्या प्राचीचा हृदयद्रावक अंत

छत्रपती संभाजीनगरमधील प्रयोग शाळेतील प्रकरण काय?

राज्य अन्न व औषध प्रशासनाच्या छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेतील अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे. प्रयोगशाळेचे सहसंचालक तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीविरोधात प्रयोगशाळेतील तब्बल 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. कर्मचाऱ्यांवर सकाळी 9 ते थेट रात्री 12 वाजेपर्यंत कामाची सक्ती केली जात असून, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही कामावर हजर राहण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत. या कारभाराविरोधात सर्व 29 कर्मचाऱ्यांच्या सह्यांचे लेखी तक्रारपत्र थेट अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे सादर करण्यात आलं आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा