Society Maintenance Rules: रिअल इस्टेटमधील गुंतवणूक आजही अनेकांची पहिली पसंत आहे. सर्वसामान्य लोक डोक्यावर छत हवं म्हणून घर खरेदी करतात तर, इतर लोक गुंतवणुकीच्या उद्देशाने किंवा मुलांच्या भविष्यातील गरजांसाठी फ्लॅट विकत घेतात. नोकरी किंवा व्यवसायामुळे इतर शहरात वास्तव्यास असल्यामुळे फ्लॅट किंवा अपार्टमेंटमध्ये कोणी राहत नाही तर, त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की तुमच्या नावे फ्लॅट आले पण तुम्ही त्यात राहत नाही किंवा पाणी, लिफ्ट, लाईट काहीच वापरत नाही तर मग पूर्ण मेंटेनन्स का द्यायचा?
घरमालकांमध्ये हा सामान्य प्रश्न आहे, पण कायद्याच्या दृष्टीने याच उत्तर थोडं वेगळं आहे. या प्रकरणाशी संबंधित संपूर्ण नियम आणि कायद्यांच्या आधारे सविस्तरपणे समजून घेऊया.
लक्षात घ्या की रिकाम्या फ्लॅटचे नियमित मेंटेनन्स किंवा देखभाल शुल्क सोसायटीला भरणे अनिवार्य आहे. सोसायट्या कॉमन सुविधा आणि पायाभूत सुविधांसाठी शुल्क करतात. तसेच तुम्ही तुमचा फ्लॅट भाड्याने दिला असेल तर फक्त अशा फ्लॅट्सवरच नॉन-ऑक्युपन्सी शुल्क आकारले जाऊ शकते, जो महाराष्ट्रासारख्या राज्यात सेवा शुल्काच्या 10 टक्केपर्यंत मर्यादित आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम आणि मॉडेल बाय-लॉजनुसार, तुम्ही त्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास असाल किंवा नसाल, फ्लॅट कुलूपबंद ठेवला असला, फ्लॅट केवळ गुंतवणुकीसाठी खरेदी केलेला असला तरीही सोसायटीचे नियमित मेंटेनन्स आणि सिंकिंग फंड भरणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. मेंटेनन्स वैयक्तिक वापरासाठी नाही तर संपूर्ण इमारतीच्या देखभालीसाठी आकारला असतो.
सामायिक मालमत्ता : लिफ्ट, जिना, सुरक्षा आणि इमारतीचा बाह्य भाग ही सर्व सर्व घरमालकांची सामायिक जबाबदारी असते.
कायदेशीर बंधने : सुप्रीम कोर्टावर फ्लॅटमध्ये कोणी राहत असो वा नसो, मेंटेनन्स शुल्क नियमित भरणे अनिवार्य आहे.
अनेकदा मेंटेनन्ससोबतच ‘नॉन-ऑक्युपन्स शुल्क’ हा शब्दही ऐकायला मिळतो. घरमालक स्वतः फ्लॅटमध्ये राहत नाही पण भाड्याने दिला असल्यास सोसायटीकडून नॉन-ऑक्युपन्सी शुल्क आकारले जाते. राज्यात NOC शुल्क मेंटेनन्स बिलमधील सेवा शुर्काच्या जास्तीत जास्त 10% इतकेच आकारले जाऊ शकते.
नॉन-ऑक्युपन्सी शुल्क कधी आकारले जाऊ शकते?
स्वतः घरमालक किंवा त्याचे कुटुंब (आई-वडील, पत्नी, मुले इत्यादी) राहत नसल्यास.
फ्लॅट इतर व्यक्तीला म्हणजे भाडेकरू किंवा पाहुण्याला भाड्याने किंवा लीव्ह आणि लायसन्सवर दिल्यास
लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.
मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.
पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.
2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.
शैक्षणिक पात्रता
प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.… आणखी वाचा