Headlines

Five family members mysteriously missing in nagpur dhantoli mobile location found in pune; नागपुरातील एकाच कुटुंबातील पाच जण रहस्यमयरीत्या बेपत्ता, मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुण्यात


नागपूर : नागपूरच्या धंतोली परिसरातून एकाच कुटुंबातील पाच जण अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २४ जूनपासून हे पाचही सदस्य घरातून निघून गेल्यानंतर परतले नसल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी धंतोली पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून विविध दिशांनी तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात बेपत्ता सदस्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुणे येथे आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धंतोलीतील बलराज मार्गावरील प्लॉट क्रमांक ४० येथील ‘दुर्गा सदन’मध्ये तक्रारदार श्यामसुंदर कीमतराय परसवानी (७१) यांचे कुटुंब राहते. त्याच इमारतीत त्यांचे दिवंगत भाऊ सुरेश कीमतराय परसवानी यांच्या कुटुंबातील सदस्यही राहत होते. हर्षा सुरेश परसवानी (५७), जितेंद्र सुरेश परसवानी (४२), ईशिता जितेंद्र परसवानी (४०), खुशी जितेंद्र परसवानी (२१) आणि एक अल्पवयीन मुलगा असे पाच जण बेपत्ता झाले आहेत.

२४ जून रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास हे पाचही सदस्य घरातून बाहेर पडले. मात्र, त्यानंतर ते घरी परतले नाहीत. सुरुवातीला ते नातेवाईकांकडे किंवा इतर परिचितांकडे गेले असावेत, असा कुटुंबीयांचा समज होता. त्यामुळे काही दिवस त्यांनी स्वतःच विविध ठिकाणी शोधाशोध केली. मात्र त्यानंतर नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ओळखीच्या व्यक्तींशी संपर्क साधूनही त्यांची कोणताही माहिती मिळाली नाही. अखेर २९ जून रोजी श्यामसुंदर परसवानी यांनी धंतोली पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची अधिकृत तक्रार दाखल केली.

तक्रार नोंद होताच धंतोली पोलिसांनी तपासाची सुरू केला आहे. त्यांचे मोबाईल कॉल डिटेल्स, तांत्रिक माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून, बेपत्ता सदस्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुणे येथे असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानुसार पुणे पोलिसांशीही समन्वय साधला जात असल्याची माहिती आहे .

दरम्यान, कुटुंबातील एका सदस्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज असल्याची माहितीही तपासादरम्यान पुढे आली आहे. मात्र, बेपत्ता होण्यामागे हेच कारण आहे का, याबाबत पोलिसांनी अद्याप कोणताही अधिकृत माहिती मिळालेली नाही, या सर्व अनुषंगाने धंतोली पोलिस तपास करत आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत