९ ऑगस्टला अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत आस्थापनेत अस्वच्छता आढळली. झुरळांचा प्रादुर्भाव, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक, गंजलेल्या रॅकवर, जमिनीवर अन्नसाठा ठेवणे, शीतसाखळी व्यवस्थापनातील त्रुटी अशा गंभीर बाबी निदर्शनास आल्या. मुदतबाह्य, छेडछाड झालेल्या पॅकेज्ड अन्नपदार्थांचा साठा आढळून आला.
MSRTC Employees Salary : एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा, रखडलेला पगार 11 ऑगस्टला होणार, परिवहन मंत्र्यांची माहितीअन्नपदार्थ साठवणूक व हाताळणीच्या ठिकाणी कीटक आणि उंदीर नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना नसल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले. कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, स्वच्छता व देखभालीचा अभाव तसेच अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी आणि आरोग्यविषयक नोंदी उपलब्ध नसल्याचे आढळले.
आस्थापनेतील भाजीपाला आणि फळांच्या साठ्यावर झुरळांचा प्रादुर्भाव असल्यानेअन्नपदार्थ दूषित होण्याचा धोका निर्माण झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. कोल्डरूममध्ये मुदतबाह्य आणि खराब झालेल्या अन्नपदार्थांचा साठाही आढळला.
या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम ३२(३) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत अन्न व्यवसायांचे परवाने व नोंदणी विनियम, २०११ नुसार अन्न परवाना निलंबित करण्यात आला.
राज्यव्यापी मोहिमेत दूध व दुग्धजन्य पदार्थांचा सुमारे साडेतेरा लाख रुपयांचा साठा, तर इतर अन्नपदार्थांचा १८,४५५.५४ किलो साठा जप्त करण्यात आला. प्रतिबंधित पान मसाला आणि गुटखा प्रकरणांत आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, अकरा जणांना अटक करण्यात आली आहे.
FDA Raid: काजू कतलीमध्ये जिवंत अळ्या असल्याची तक्रार, FDA ने तत्काळ धाड टाकली; काय-काय आढळून आलं?बुलढाण्यातील रिलायन्स रिटेलच्या दुकानात ‘लक्ष्मी नारायण’ ब्रँडच्या काजू कतलीमध्ये बुरशी आणि जिवंत अळ्या आढळल्याची तक्रार आल्यानंतर तेथेही कारवाई करण्यात आली. बीड जिल्ह्यातील पाच तेल उत्पादन आणि रीपॅकिंग आस्थापनांवर कारवाई करत ‘एफडीए’ने १ कोटी ९४ लाख ५० हजार ९२२ रुपयांचा माल जप्त केला. या सर्व आस्थापनांचे ‘एफएसएसएआय’ परवाने तत्काळ निलंबित करून संबंधित व्यवसाय बंद केले. एकूण २७ नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.
९० हॉटेल-रेस्टॉरंटची तपासणी
७ ते ९ ऑगस्टदरम्यान राज्यातील ९० हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी आठ आस्थापनांना सुधारणा नोटिसा देण्यात आल्या, तर एका आस्थापनेचा परवाना निलंबित करण्यात आला. अन्नाच्या गुणवत्तेबाबत तक्रार करण्यासाठी टोल-फ्री क्रमांक १८००२२२३६५ उपलब्ध असल्याची माहिती ‘एफडीए’ने दिली.

