मुळात, SBI, HDFC, ICIC सारख्या मोठ्या सर्वसाधारण बँकांपेक्षा स्मॉल फायनान्स बँक फिक्स्ड डिपॉझिटवर जास्त व्याजदर देतात. शेतकरी, छोटे उद्योजक तसेच कमी उत्पन्न असणाऱ्या ग्राहकांसाठी आरबीआयने स्मॉल फायनान्स बँक निर्माण केले. त्यामुळे अशा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध स्मॉल फायनान्स बँका कसलीही कमतरता ठेवत नाहीत.
कोणत्या बँकेत फिक्स्ड डिपॉझिटवर मिळतो सर्वाधिक व्याजदर?
सध्या सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेकडे सीनियर सिटीजनसाठी एक उत्तम योजना आहे. तिथे पाच वर्षांच्या एफडीवर 8.05% इतका व्याजदर मिळतो. सीनियर सिटीजनसाठी असणाऱ्या एफडीवर सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या बँकांच्या यादीत सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक सगळ्यात वरती आहे. त्यानंतर जन स्मॉल फायनान्स बँक दुसऱ्या क्रमांकावर असून सीनियर सिटीजनच्या पाच वर्षांच्या एफडीवर 8.00% व्याजदर देतात. Equitas स्मॉल फायनान्स बँकेचा व्याजदर 7.50% आहे तर AU स्मॉल फायनान्स बँक तसेच Slice स्मॉल फायनान्स बँकेचा व्याजदर 7.25 टक्के आहे. ज्येष्ठ नागरिकांनी एफडीमध्ये गुंतवणूक करून त्यावर चांगला व्याज मिळवण्यासाठी या बँका प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. मुळात, हे व्याजदर 3 कोटींपेक्षा कमी रकमेच्या एफडीसाठी लागू आहेत.
एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा!
एफडीवर मिळणारा व्याजदर जरी जास्त असला तरी ती एफडी सुरक्षित आणि उत्तम ठरत नाही. ज्या बँकेत तुम्ही गुंतवणूक करणार आहात त्या बँकेचा इतिहास तसेच इतर बऱ्याच गोष्टी आधी तपासाव्यात त्यानंतरच गुंतवणूक करण्याचा विचार करावा. फक्त व्याज जास्त मिळतोय त्यामुळे तपासाशिवाय गुंतवणूक करू नये.
मोठ्या बँकांमध्ये किती आहे व्याजदर?
ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या एफडी योजनेत SBI कडून 7.05% दराने व्याज मिळू शकतो. तर HDFC बँकेत ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या चार वर्ष सात महिने एक दिवसांच्या एफडी योजनेत 6.90% दराने व्याज मिळतो. तर आयसीआयसी बँकेत पाच वर्षांसाठी सात पॉईंट दहा टक्के दराने व्याज मिळतो. पीएनबी बँकेत पाच वर्षांच्या एफडी साठी 6.85% व्याजदर आहे
8% FD वर मिळणारी Real Return किती?
जर एखादी एफडी तुम्हाला 8% व्याजदर देत असेल तरीही देशातला महागाई दर तुमच्या एफडीवर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेला प्रभावित करू शकतो. समजा, महागाई दर 5% असेल तर तुमच्या व्याजदरातून इन्फ्लेशन वजा केला जाईल आणि तुम्हाला 3% दराने व्याज दिला जाईल.
Reddit Post: ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार; पानवाल्याची कोट्यवधींची कमाई पाहून बेरोजगार MBA पदवीधरही थक्कजास्त टीडीएस कापून गेला तर…
अनेकदा आपल्या फिक्स्ड डिपॉझिटमधून जास्त टीडीएस कापला जाऊ शकतो पण यात घाबरून जाण्याची काहीच गरज नाही कारण अतिरिक्त कापला गेलेला टीडीएस रिफंड क्लेम करून आयटीआरच्या माध्यमातून मिळवता येतो.

